कलंक
धर्मा प्रॉडक्शनच्या कलंक ह्या चित्रपटाची प्रदर्शन होण्यापूर्वी खूप चर्चा होती. याचे गाणे लोकांना पसंत पडले होते मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा हिरमोड झाला. माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी मोठी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं बजेट 150 कोटींचं होतं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 145.62 कोटींची कमाई करू शकला.
स्टुडंट ऑफ द इयर २
2012 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'स्टुडंट ऑफ द इयर' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हेच कारण होतं की करण जोहरने चित्रपटाचा सीक्वल करण्याचा निर्णय घेतला. सीक्वलमध्ये तारा सुतारिया, अनन्या पांडे आणि टायगर श्रॉफ हे कलाकार काही कमाल करतील अशी अपेक्षा असताना चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करू शकला. या चित्रपटाने 97.81 कोटी रुपयांची कमाई केली होती.
भारत
स्वत:च्या बळावर कोंटीमध्ये कमाई करून देणारा सलमान खान भारत या चित्रपटात आपली जादू दाखवला शकला नाही. ईदच्या वेळी हिट चित्रपटाची अपेक्षा करणार्यांना प्रेक्षकांचा हिरमोड झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली असली तरी प्रेक्षकांच्या मनता जागा निर्माण करण्यात अयशस्वी ठरला. जेव्हाकि या चित्रपटात सलमानसोबत प्रेक्षकांची आवडती जोडी अर्थात कॅटरीना कैफ देखील नायिकेच्या भूमिकेत होती.
मणिकर्णिका
झांसीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित कंगना रनौतची महत्वाकांक्षी मूव्ही मणिकर्णिका बॉक्स ऑफिसवर कमाल करण्यात अपयशी ठरली. चित्रपटाची लागत देखील निघाली नाही. दिग्दर्शक म्हणून कंगाने स्वत: कमान घेतल्यावर काही कलाकारांमध्ये बदल केल्याने रीशूटमुळे चित्रपटाचं बजेट वाढलं. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, कंगनाच्या अभिनयाचे कौतुक देखील झाले परंतू एकूण नुकसान झालं.