2019 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी चांगलं गेलं. टीम इंडियाने वर्षभरात अनेक स्पर्धा स्वत:च्या नावावर केल्या. या वर्षी सर्व महत्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला. जाणून घ्या त्या 4 भारतीय गोलंदाजांबद्दल ज्यांनी गेल्या वर्षी हॅटट्रीक घेतली.
वेस्ट इंडिज दौऱ्यात जमैका कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने हॅटट्रीक घेतली.
2019 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात हॅटट्रीक नोंदवली.
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यात दुसऱ्या वन-डे मध्ये कुलदीप यादवने हॅटट्रीकची नोंद केली.
बांगलादेशच्या भारत दौऱ्यात शेवटल्या टी-२० सामन्यात दीपक चहरने हॅटट्रीकची नोंद केली.