भारतात गूगलवर सर्वाधिक सर्च झालेली व्यक्तिमत्त्वे

मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (11:27 IST)
या वर्षी अनेक व्यक्तिमत्वांनी लोकांच्या मनावर आपली छाप सोडली. नवे चेहरे देखील चर्चेचा विषय ठरले. प्रसिद्ध लोकांबद्दल माहिती मिळवण्यासाठी नेटिझन्सनी त्यांचे नाव मोठ्या प्रमाणावर गुगलवर सर्च केले. तर या वर्षी पंतप्रधान मोदी किंवा क्रिकेट स्टार विराट कोहली यांचे नाव यादीत नसून वेगळ्याच व्यक्तीचे नाव गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे. त्याला देशाचा नायक देखील म्हटले गेले होते. या वर्षी एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानी विमानांनी केलेल्या हल्ला परतवून लावणार्‍या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे नाव सर्वाधिक सर्च केले गेले आहे. या व्यतिरिक्त यादीत कोणते नाव आहेत जाणून घ्या:
 
अभिनंदन वर्धमान
लता मंगेशकर
युवराज सिंग
आनंद कुमार
विकी कौशल
ऋषभ पंत
रानू मंडल
तारा सुतारिया
सिद्धार्थ शुक्ला
कोएन मिश्रा
 
तसेच या वर्षी अनेक घटना घडल्या. पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइक, लोकसभा निवडणूक, राज्यांच्या निवडणूक, क्रिकेट वर्ल्डकप, चांद्रयान-2 मोहिम, कलम 370, नागरिक दुरस्ती विधेयक या सर्व घटना सर्च केल्या गेल्या परंतू त्यापैकी सर्वाधिक पसंती क्रिकेटला मिळाली. या वर्षी क्रिकेट वर्ल्ड कप याबाबत सर्वाधिक सर्च केले गेले. ओव्हरऑल श्रेणीत या सर्चला पहिले स्थान मिळाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख OMG! कॅटरीना कॅफला मागे टाकत हिना खान बनली तिसरी सेक्सिएस्ट आशियाई वूमन, जाणून घ्या कोण आहे नंबर 1