Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Russia Ukraine war: रशियाने युक्रेनमधील लष्करी कमांडर बदलला

Webdunia
शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (21:34 IST)
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, मॉस्कोने युक्रेनवरील आक्रमणाची पुनर्रचना करण्यासाठी आणि नव्या जोमाने हल्ले वाढवण्यासाठी नवीन कमांडरची नियुक्ती केली आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी चीफ ऑफ द जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांची युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाईसाठी संपूर्ण कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. 
 
युक्रेन युद्धात सर्गेई सुरोविकिन यांच्या जागी नवीन कमांडरची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सिरोव्हकिन हे युद्धाचे नेतृत्व करत होते. मात्र आता त्यांचे अवमूल्यन करण्यात आले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, लष्करी दलाच्या शाखांमध्ये चांगल्या समन्वयासाठी हे फेरबदल करण्यात आले आहेत. मॉस्कोस्थित तज्ज्ञाने अल-जझीराला सांगितले की युक्रेन युद्ध आणखी धोकादायक असेल कारण स्वत: चीफ ऑफ स्टाफची उपस्थिती महत्त्वपूर्ण आहे. दुसरीकडे, रशियाच्या वॅगनर ग्रुपने पूर्व युक्रेनमधील सॉलेदार या मिठाच्या खाण शहरावर कब्जा केल्याचा दावा केल्यानंतर येथील युद्ध अधिक उग्र बनले आहे. 
युक्रेनचे सैन्य मागे हटण्यास तयार नाही.
 
रशियन लष्करी कमांडर सुरोविकिनला युक्रेन युद्ध जिंकता आले नाही म्हणून त्याला युक्रेनियन आघाडीतून हटवले गेले नाही. उलट त्यामागे राजकीय कारणे आहेत. संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि रशियाचे चीफ ऑफ जनरल स्टाफ यांच्या माध्यमातून थेट पुतीन यांच्यापर्यंत पोहोचून युद्ध कमांडर झाल्यापासून सुरोविकिन खूप शक्तिशाली झाले होते.
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments