Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रशिया युक्रेन युद्ध : रशिया इन्स्टाग्रामवर बंदी घालण्याची तयारी करतंय, कारण..

Webdunia
शनिवार, 12 मार्च 2022 (22:26 IST)
युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता रशिया सोशल मीडियावरील निर्बंध वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या रशियामध्ये इन्स्टाग्रामवर बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. इन्स्टाग्रामवरून रशियन सैनिकांविरोधात हिंसेला खतपाणी दिल्याच्या आरोपावर ही कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटाने मागे सांगितलं होत की, "मेटा काही देशांत आपल्या प्लॅटफॉर्मवरून रशियन सैनिकांविरुद्ध हिंसेला खतपाणी देत असणाऱ्या पोस्ट हटवणार नाही."
 
थोडक्यात रशियन सैनिकांविरुद्ध असणाऱ्या सर्व पोस्ट मेटाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर टाकता येतील. पण त्यात असंही म्हटलं होतं की, रशियन नागरिकांविरुद्ध हिंसा प्रवृत्त करणाऱ्या पोस्टला परवानगी दिली जाणार नाही.
 
आता मेटाच्या या धोरणावर रशियाने अमेरिकेला विचारणा केली आहे. तसेच सोशल मीडिया कंपनीद्वारे सुरू असलेल्या अशा कारवाया थांबवण्यास सांगितलं आहे. इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या तपास समितीने मेटाविरुद्ध गुन्हेगारी तपास सुरू केला आहे.
 
मेटा ही फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप या सोशल आणि मॅसेजिंग प्लॅटफॉर्मची पॅरेंट कंपनी आहे.
 
रशियामध्ये 4 मार्च ला फेसबुकवर बंदी आणण्याची बातमी समोर आली होती. व्हॉट्सअॅप एक मॅसेजिंग ऍप असल्याकारणाने सद्यस्थितीत रशियामध्ये व्हॉट्सऍपवर बंदी घालण्यात आलेली नाही.
 
कीव्हजवळ हल्ल्यांमधील वाढ
रशियन सैन्याची एक तुकडी दुपारपर्यंत युक्रेनची राजधानी कीव्ह शहराच्या मध्यवर्ती भागापासून 15 मैलांवर (25 किलोमीटर) पोहचल्याचं ब्रिटीश संरक्षण मंत्रालयाने गुप्त माहितीच्या आधारे म्हटलंय.
 
राजधानीच्या उत्तरेला असलेली रशियन सैन्याची मोठी तुकडी आता विभागली गेली असून 'हे कदाचित शहराला वेढा घालण्याच्या हेतूने करण्यात आलं असावं' असं मंत्रालयाने म्हटलंय.
 
"प्रत्युत्तरादाखल युक्रेन करत असलेल्या हल्ल्यांमध्ये आपलं कमी नुकसान व्हावं म्हणूनही हे करण्यात आलं असावं. कारण युक्रेनच्या हल्ल्यांमध्ये त्यांचं आधीच खूप नुकसान झालेलं आहे."
 
यासोबतच युक्रेनमधल्या चर्नीहीव्ह, खारकीव्ह, मारिओपोल आणि सुमी शहरांनाही रशियन सैन्याने घेरलंय आणि या शहरांवरही सतत हल्ले करण्यात येतायत.
 
शनिवारी (12 मार्च) युक्रेनची राजधानी कीव्ह शहरासोबतच इतर अनेक शहरांमध्येही हल्ल्याची सूचना देणारे सायरन ऐकू आले.
 
तर रशिया मारिओपोल शहरामधून लोकांना सुरक्षित बाहेर पडू देत नसल्याचा आरोप युक्रेनने पुन्हा एकदा केलाय.
मारिओपोल शहरातली परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याचं युक्रेन सरकारचं म्हणणं आहे. इथे आतापर्यंत 1500 लोकांचा मृत्यू झाला असून बचावलेल्या लोकांकडे अन्नपाणी नाही. युक्रेनमध्ये सध्या थंडी आहे पण मारिओपोलमधल्या लोकांना सध्या वीज पुरवठा होत नसल्याने त्यांच्याकडे हीटिंग उपलब्ध नाही.
 
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. रशियातल्या मातांनी आपल्या मुलांना युद्धावर पाठवू नये असं आवाहन त्यांनी केलंय. तर रशियाच्या विरोधात लढण्यासाठी आपण युक्रेनमध्ये आपले सैनिक पाठवणार नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. पण रशियावरचे निर्बंध वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

चोरीच्या संशयावरून तीन तरुणांना दोरीने बांधून बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

दारूच्या नशेत पित्याने एका महिन्याच्या मुलीला मारले

2036 ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवणे आणि टॉप 10 मध्ये येण्याचे भारताचे उद्दिष्ट-क्रीडा मंत्री मनसुख मांडविया

सत्तेसाठी देशाचे तुकडे करायला मागेपुढे पाहत नाही,कंगना राणौतचा पुन्हा राहुल गांधींवर निशाणा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी

पुढील लेख
Show comments