Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रशियाचे क्षेपणास्त्र युक्रेनच्या विमानतळावर पडले, स्फोटानंतर आग

रशियाचे क्षेपणास्त्र युक्रेनच्या विमानतळावर पडले  स्फोटानंतर आग
Webdunia
गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (16:47 IST)
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात केलेल्या घोषणेनंतर रशियन सैन्याचे हल्ले तीव्र झाले आहेत. रशियन सैन्य युक्रेनमधील शहरांमधील लष्करी तळांवर हल्ले करत आहे. सध्या, रशियन लष्कराचे म्हणणे आहे की ते नागरी लक्ष्यांना लक्ष्य करत नाहीत. पण याचदरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये इव्हानो-फ्रँकिव्हस्क विमानतळावर रशियन क्षेपणास्त्र पडताना दिसत आहे. 30 सेकंदांचा हा व्हिडिओ एका वृत्तसंस्थेने जारी केला आहे, जो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

विमानतळाजवळील इमारतीवर क्षेपणास्त्र आदळले, त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि धुराचे लोट उठताना दिसत आहेत. युक्रेनच्या गृहमंत्रालयाचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी सांगितले की, रशियन सैन्य क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. युक्रेनच्या लष्करी तळांवर हे हल्ले केले जात आहेत. रशियन सैन्य कीव, खार्किव आणि डनिप्रो शहरातील युक्रेनियन एअरबेस आणि लष्करी डेपोंना लक्ष्य करत आहे. तथापि, रशियन सैन्य सातत्याने सांगत आहे की ते लोकवस्तीच्या भागात हल्ले करत नाहीत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये काही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की कीवमध्ये पहाटे 5 च्या सुमारास काही स्फोट ऐकू आले. 

<

Airports being closed & schools going remote in southern Russia suggest the military operation may not just be this morning

— Alec Luhn (@ASLuhn) February 24, 2022 >कीवमध्ये काही स्फोट झाले आणि नंतर लोकांनी गोळीबाराचे आवाज ऐकले. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत २२ नक्षलवादी ठार तर एक जवान शहीद

LIVE: दिशा सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले ‘मला बदनाम करण्याचा प्रयत्न’

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले

बंद खोलीत 87 किलो सोन्याचे बार सापडले

पुढील लेख
Show comments