Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टिटरवरून मिळवा सचिनची सही

वेबदुनिया
WD
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची सही आणि संदेश असलेला फोटो मिळवून देण्यासाठी ‘बीसीसीआय’ आणि ‘डिजिग्राफ’ ने ‘थँक यू सचिन’ ही मोहीम टिटरवर सुरू केली आहे. या मोहिमेत लाखोंच्या संख्येनी सचिनप्रेमी सचिनविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सध्या अशा ट्विट सचा आकडा सात लाखांहून अधिक झाला आहे.

सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सन्मानार्थ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि ‘डिजिग्राफ’ च्या एकत्रित प्रयत्नांमधून मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून सचिनच्या पल्लेदार हस्ताक्षरातील स्वाक्षरी आणि संदेश असलेला फोटो उपलब्ध करून दिला जात आहे. विशेष म्हणजे, टिटरचे अकाउंट ज्या नावाने असेल, त्यालाच उद्देशून हा संदेश उपलब्ध होत आहे. त्यासाठी बीसीसीआयने 1989 ते 2011 या काळातील सचिनचे अनेक फोटो उपलब्ध करून दिले आहेत. असा फोटो मिळविण्यासाठी टिटरवरून ‘बीसीसीआय’ चे टिटर हँडल आणि ‘थँक्यू यू सचिन’ हे शब्द ‘हॅश टॅग’ च्या साहाय्याने वापरून आपला संदेश टिट करणे आवश्यक आहे. या दोन्ही बाबी असणारा संदेश ट्वि ट केला, की लगेचच ‘बीसीसीआय’ कडून तेंडुलकरच्या फोटोची डिजिग्राफची लिंक री- ट्वि ट केली जात आहे. क्रिकेटपटू युवराजसिंग, गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणेचाही यात समावेश आहे. प्रत्येक फोटोवर सचिनची वेगळी छबी आणि वेगळा संदेश असल्याने एकाच व्यक्तीकडून अनेकदाही ट्विट करून फोटो गोळा केले जात आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केला

MUM vs MP: मुंबईचे देशांतर्गत क्रिकेटवर वर्चस्व,जिंकले सय्यद मुश्ताक ट्रॉफीचे विजेतेपद

हेड आणि स्मिथच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 400 ओलांडली, बुमराहने 5 विकेट घेतल्या

राहुल द्रविडचा मुलगा अन्वय याने विजय मर्चंट ट्रॉफी सामन्यात नाबाद शतक झळकावले

Champions Trophy:भारतीय संघाचे सामने दुबईत होणार,लवकरच अधिकृत घोषणा

Show comments