॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥ साङ्गोपाङ्ग सद्नुरु स्तवणें । ठकले वेद आणि पुराणें । तेथें मी अजाण नेणतेपणें । बरें राहणें निवान्त ॥१॥ खरें पाहतां धरावें मौन । हेंच कीं वस्तुत: सद्नुरुस्तवन । परी साईंचे एकेक...