Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कहाणी सोमवारची फसकीची

Webdunia
WD
ऐका महादेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, त्यांत गरीब सवा‍शीण बाई रहात असे. तिनं आपलं श्रावणमास आला, म्हणजे काय करावं? दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा घ्याव. एक उपडा दुसरा उताणा पसाभार तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावं पूजा करावी, नंतर प्रार्थनेच्या वेळी 'जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी,' असं म्हणून महादेवाच्या मस्तकी कांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं.

WD
असं चारी सोमवारी तिनं केलं. शठकर तिला प्रसन्न झाला. दिवसोंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाचे वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठविली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठविला. आणि आपल्या व्रताची समाप्ति केली. शंकरांनी तिला निरोप पाठविला- अजून तुल नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढं शंकरांनी तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला. तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

आरती गुरुवारची

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Show comments