Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाग पंचमी : भारतात नाग पूजेशी निगडित जाणून घ्या 11 मनोरंजक माहिती

Webdunia
शनिवार, 18 जुलै 2020 (13:03 IST)
भारतात प्राचीन काळापासूनच नागपूजेचे प्रचलन आहे. श्रावण महिन्याच्या नागपंचमीला नागाची पूजा करतात. नागाशी निगडित बऱ्याच गोष्टी आजतायगत भारतीय संस्कृती, धर्म आणि परंपरेचा एक भाग बनल्या आहेत. जसे नागदेव, नागलोक, नागराज-नागराणी, नागदेऊळ, नागवंश, नागकथा, नागपूजा, नागोत्सव, नाग नृत्य-नाट्य, नागमंत्र, नागव्रत आणि आता नाग कॉमिक्स. चला जाणून घेऊया संदर्भात 11 मनोरंजक माहिती..
 
अनिरुद्ध जोशी
 
1 नागाचे धार्मिक महत्त्व : हिंदू धर्मानुसार शिवाने वासुकी नावाच्या नागाला आपल्या गळ्यामध्ये ठेवले आणि विष्णूने देखील शेष शैय्येवर निजून नागाच्या महत्वाला दर्शविले आहेत. जैन धर्मात देखील पार्श्वनाथाला शेषनागावर बसलेले दर्शविले आहेत. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी नागांमध्ये अनंत (शेषनाग) आहे. पुराणानुसार असे म्हणतात की आपली पृथ्वी देखील शेषनागाच्या फणांवर टिकून आहे.
 
2 अथर्ववेदांमध्ये नाग : अथर्ववेदांमध्ये काही नागांची नावं नमूद आहे. हे नाग आहेत - श्वित्र, स्वज, पृदाक, कल्माष, ग्रीव आणि तिरिचराजी नागांमध्ये चित कोब्रा (पृश्चि), काळा फणियर (करैत), गवताच्या रंगाचे (उपतृण्य), पिवळा (ब्रम), असिता रंगरहित (अलीक), दासी, दुहीत, असती, तगात, अमोक आणि तवस्तु इत्यादी.
 
3 या पंथांमध्ये नागाच्या पूजेची प्रथा आहे : असे मानले जात आहे की मुळात: शैव, शाक्त, नाथ आणि नागपंथी आणि त्यांच्याशी निगडित उप-पंथामध्येच नाग पूजनेचे महत्त्व होते. पण आता सध्या सर्व पंथातील लोकं नागांची पूजा करतात.
 
4 नागाची कश्यप आणि कद्रूची मुलं : पुराणानुसार सर्व नाग ऋषी कश्यप आणि त्यांचा पत्नी कद्रूची मुलं आहेत ज्यांची नावे खालील प्रमाणे आहेत- 
1. अनंत 2. कुलिक 3. वासुकी 4. शंकुफळा 5. पद्म 6. महापद्म 7. तक्षक 8. कर्कोटक 9. शंखचूड़ 10. घातक 11. विषधान 12. शेष नाग. 
अनंत (शेष), वासुकी, तक्षक, कर्कोटक आणि पिंगळा - हे 5 नागांच्या कुळाच्या लोकांचाच भारतात आधिपत्य होते. यांच्यापासूनच नागवंश सुरू झाला. ज्याप्रमाणे सूर्यवंशी, चंद्रवंशी आणि अग्निवंशी मानले जातात. त्याचप्रमाणे नागवंशांची देखील प्राचीन प्रथा आहेत.
 
5 नाग वंश : नल, कवर्धा, फणी-नाग, भोगीन, सदाचंद्र, धनधर्मा, भूतनंदि, शिशुनंदि किंवा यशनंदि तनक, तुश्त, ऐरावत, धृतराष्ट्र, अही, मणिभद्र, अलापत्र, कम्बल, अंशतर, धनंजय, कालिया, सौंफू, दौद्धिया, काली, तखतू, धूमल, फाहल, काना, गुलिका, सरकोटा इत्यादी नावाचे नागवंशी आहेत. अग्नीपुराणात 80 प्रकारच्या नागकुळाचे वर्णन आहे, ज्यामध्ये वासुकी, तक्षक, पद्म, महापद्म प्रख्यात आहेत. नागांचे स्वतंत्र लोक नागलोकाचं पुराणामध्ये उल्लेख मिळतो. अनादिकाळापासूनच नागांचे अस्तित्वाचे वर्णन देवी देवतांसह केले गेले आहेत. जैन बौद्ध देवांच्या डोक्यावर देखील शेष छत्र असतं. असम, नागालैंड, मणीपूर, केरल आणि आंध्र प्रदेशात नागा जातींचे वर्चस्व आहेत. अथर्ववेदांमध्ये काही नागांच्या नावांचा उल्लेख केला गेला आहेत. हे नाग आहे श्वित्र, स्वज, पृदाक, कल्माष, ग्रीव आणि तिरिचराजी नागांमध्ये चित कोब्रा (पृश्चि), काळाफणियर (करैत), गवताच्या रंगाचा (उपतृण्य), पिवळा(ब्रम), असिता रंगरहित (अलीक), दासी, दुहीत, असती, तगात, अमोक आणि तवस्तु इत्यादी.
 
6 पाताळ लोकांचे नाग : नाग जातींच्या लोकांना पाताळाचे रहिवासी मानतात. पृथ्वीवरच सात पाताळांचे वर्णन पुराणात केले गेले आहेत. हे सात पाताळ आहे- अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ आणि पाताळ.
सुतळ नावाच्या पाताळात कश्यपांची पत्नी कद्रू पासून जन्मलेले अनेक डोकं असलेले नाग आणि कश्यपांच्या पत्नी क्रोधवशापासून जन्मलेल्या सापांचा समुदाय राहतो ज्यामध्ये कहूक, तक्षक, कालिया आणि सुषेण इत्यादी प्रमुख नाग आहेत. लक्षात ठेवा की साप आणि नाग हे दोन्ही वेगळे आहेत. सर्व नाग कद्रूचे मुलं होते तर सर्व साप हे क्रोधवशाचे मुलं असे. कश्यपांच्या क्रोधवशा नावाच्या राणीने साप, विंचू सारखे विषारी प्राणी जन्मले.
 
7 मनसा देवी नाग माता : देवी मनसा जी शिवाची मुलगी आहे, त्यांना देखील नाग माता म्हणतात, ज्यांचे लग्न जरत्कारू नावाच्या ऋषींसह झाले असे. एकदा राजा जनमेजयाने त्याचे वडील नागदंशाने मरण पावल्यावर, सर्व नागांना भस्मसात करण्यासाठी नाग यज्ञ केले. त्याचे परिणाम म्हणून सर्व नाग यज्ञ वेदीत पडून भस्मसात होऊ लागले. त्यानंतर मनसा देवींच्या मुलाने आस्तिकाने असे उपाय योजिले की ज्यामुळे नाग यज्ञ बंद झाले आणि सर्व नागांचे रक्षण झाले. तेव्हापासूनच मनसा देवी देखील नाग माता म्हणून ओळखली जाते.
 
8 नाग साम्राज्य : महाभारताच्या काळात पूर्ण भारतात नागा जातींचे समुदाय पसरले होते. विशेषतः कैलास पर्वताच्या जवळच्या भागात असम, मणीपूर, नागालँड पर्यंत यांचेच वर्चस्व असे. हे लोकं सर्प पूजक असल्यामुळे नागवंशी म्हणवले. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की शक किंवा नाग जाती हिमालयाच्या त्या भागास होती त्या भागास तिब्बत आहे आता पर्यंत तिब्बती देखील आपल्या भाषेला 'नागभाषा' असे म्हणतात.
 
9 काश्मिरातील अनंतनागाच्या नागांची राजधानी : एका सिद्धान्तानुसार हे मुळात काश्मीरचे होते. 'काश्मिरातील अनंतनागाचे परिसर यांचा गढ मानला आहे. कांगडा, कुल्लू आणि काश्मीरसह इतर डोंगरी भागात नाग ब्राह्मणाची एक जाती आजतायगत आहे. नाग वंशावळीत शेष नागाला नागांचा पहिला राजा मानतात. शेष नागालाच अनंत नावाने ओळखतात. अश्या प्रकारे अनंतानंतर वासुकी झाले मग तक्षक आणि पिंगळा. वासुकीचे कैलास जवळच राज्य होते आणि अशी आख्यायिका आहे की तक्षकानेच तक्षशीलेचा निर्माण करून आपल्या नावाने 'तक्षक' कूळ चालविले. या तिन्ही कथा पुराणात आढळते. त्यानंतरच कर्कोटक, ऐरावत, धृतराष्ट, अनंत, अही, मणिभद्र, अलापत्र, कंबल, अंशतर, धनंजय, कालिया, सौफू, दौद्धिया, काली, तखतू, धूमल, फाहल, काना इत्यादी नावाने नागांचे वंशज होते. भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी यांचे राज्य होते. नागा आदिवासीचे संबंध देखील नागांशी मानले आहेत. छत्तिसगढाच्या बस्तर येथे देखील नल आणि नाग वंश आणि कवर्धाच्या फणी-नाग वंशीयांचा उल्लेख आहे. पुराणात मध्यप्रदेशातील विदिशावर राज्य करणाऱ्या नाग वंशीय राजांमध्ये शेष, भोगीन, सदाचंद्र, धनधर्मा, भूतनंदी, शिशुनन्दी किंवा यशनंदी इत्यादींचा उल्लेख मिळतो.
 
पुराणानुसार एक काळ असाही होता जेव्हा नागा समाज संपूर्ण भारतात(पाक-बांगलादेश) शासक असे. त्या दरम्यान त्यांनी भारताच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी आपल्या विजयाचे झेंडे फडकवले होते. तक्षक, तनक आणि तुष्ट नागांच्या राजवंशाची पूर्वीपासूनची परंपरा आहे. या नाग वंशींमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी सर्व समाजाचे आणि प्रांतांचे लोकं होते.
 
10 शहर आणि गाव : नागवंशीयांनी भारताच्या बऱ्याच भागात राज्य केले. याच कारणास्तव भारतातील अनेक शहर आणि गाव 'नाग' शब्दांवर आधारित आहे. आख्यायिका आहे की महाराष्ट्राचे नागपूर शहर सर्वात आधी नागवंशीयांनी वसविले होते. तिथल्या नदीचे नाव नाग नदी देखील नागवंशीयांमुळे पाडले. नागपूरच्या जवळ प्राचीन शहर आहे त्याचे नाव नागरधन आहे महार जातीमुळे महाराष्ट्रापासून महाराष्ट्र झाला. महार जाती देखील नागवंशीयांचीच एक जात होती. या व्यतिरिक्त हिंदी भाष्यी राज्यात 'नागदाह' नावाचे बरेच शहर आणि गाव सापडतील. त्या जागेवरून देखील अनेक दंतकथा आहेत. नागा किंवा नागालँडला का बरं नागवंशीयांची भूमी मानले जाऊ शकत नाही.
 
11 नागकन्या : कुंतीच्या मुलगा अर्जुनाने पाताळाच्या एका नागकन्येशी लग्न केले होते. जिचे नाव उलुपी होते. ती विधवा असे. अर्जुनाशी लग्न करण्याचा पूर्वी एका बागेशी झाले होते ज्याला गरुडाने खाऊन टाकले होते. अर्जुन आणि उलूपीचा मुलगा अरावन होता ज्याचे दक्षिण भारतात देऊळ आहे आणि नपुंसक लोकं किंवा तृतीयपंथी लोकं त्यांना आपले पती मानतात. भीमाचा मुलगा घटोत्कचाचे लग्न देखील एका नागकन्येशी झाले होते. जिचे नाव आहिलवती होते आणि ज्याचा शूर योद्धा बर्बरिक होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री दत्तगुरुशरणाष्टकम्- दत्तात्रेया तव शरणं

उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments