श्रीगणेशाय नमः ॥ धराधरेंद्रनंदिनीमानससरोवर ॥ मराळ उदार कर्पूरगौर ॥ अगम्य गुण अपार ॥ तुझे वर्णिती सर्वदा ॥१॥ न कळे जयाचें मूळ मध्य अवसान ॥ आपणचि सर्वकर्ता कारण ॥ कोठें प्रगटेल ज्यांचें आगमन ॥ ठाई न पडे ब्रह्मादिकां ॥२॥ जाणोनि भक्तांचे मानस ॥ तेथेंचि प्रगटे जगन्निवास ॥ येचविषयीं सूतें इतिहास ॥...