Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भगवान शंकराच्या गळ्यात गुंडाळलेल्या 10 नागांचे गुपित जाणून घेऊ या ....

भगवान शंकराच्या गळ्यात गुंडाळलेल्या 10 नागांचे गुपित जाणून घेऊ या ....
, मंगळवार, 21 जुलै 2020 (17:58 IST)
आपण भगवान शंकराच्या तसबिरीमध्ये त्यांचा गळ्यात गुंडाळलेल्या नागाला बघितलेच असणार अखेर हे नाग कोण असे काय आहे त्याचा मुळाचे गुपित जाणून घेऊ या संदर्भात काही विशेष 10 गोष्टी ...
1 भगवान शंकराच्या गळ्यात गुंडाळलेल्या नागाचे नाव वासुकी आहे.
2 वासुकी नागाचे वडील ऋषी कश्यप आणि आई कद्रू होती.
3 वासुकी नागाच्या मोठ्या भावाचे नाव शेष(अनंत) आणि इतर भावांचे नाव तक्षक, पिंगळा आणि कर्कोटक होते.
4 शेष नाग विष्णूचे सेवादार असे. वासुकी भगवान शिवाचे सेवादार होते. वासुकी महादेवाचे मोठे भक्त होते. वासुकीच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान महादेवाने त्यांना आपल्या गणात समाविष्ट केले.
5 अशी आख्यायिका आहे की वासुकीचे कैलास पर्वताजवळ राज्य होते. हे देखील म्हटले जाते की वासुकीला
नागलोकाचा राजा मानला गेला आहे.
6 भगवान शिवासह वासुकी नागाची पूजा देखील केली जाते. म्हणून नागपंचमीला शेषनागाच्या नंतर वासुकी नागाची पूजा करणे आवश्यक असतं.
7 समुद्र मंथनाच्या दरम्यान वासुकी नागालाच दोऱ्याच्या रूपात मेरू पर्वताच्या अवती भवति गुंडाळून मंथन केले गेले, या मुळे त्यांचा संपूर्ण शरीरातून रक्तस्त्राव झाले.
8 असे मानले जाते की वासुकीच्या कारणामुळेच नाग जातीच्या लोकांनी सर्वप्रथम शिवलिंगाची पूजा सुरू केली.
9 वासुकीनेच कुंतीपुत्र भीमाला दहा सहस्र हत्तीचे बळ प्राप्त करण्याचे वर दिले होते. जेव्हा भीमाला दुर्योधनाने फसवून विष पाजून गंगेत फेकून दिले होते तेव्हा भीम नागलोकात पोहोचले. तेथे भीमाच्या आजोबांनी वासुकीला सांगितले की हे कोण आहेत तेव्हा वासुकी नागाने भीमाचे विष काढून घेतले आणि त्याला दहा सहस्र हत्तीचे बळ दिले.
10 वासुकीच्या डोक्यावरच नागमणी होत असे. जेव्हा भगवान श्रीकृष्णाला कंसाच्या तुरुंगातून गुपचुपरीत्या
वासुदेव त्यांना गोकुळात नेत होते तेव्हा वाटेत जोरदार पावूस सुरू झाला. या पावसातून आणि यमुनेच्या पुरापासून वासुकी नागानेच श्रीकृष्णाचे रक्षण केले होते. जरी काहींचा विश्वास असा आहे की शेषनागानेच असे केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाग पंचमी 2020 कधी आहे : जाणून घेऊ या शुभ मुहूर्त, मंत्र आणि कथा..