Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 13

वेबदुनिया
WD
एकदा राजा विक्रमादित्यने आपल्या नगरीत महाभोजचे आयोजन केले होते. त्यासाठी विद्धान, ब्राह्मण, व्यापारी तसेच नगरीतील जनता मोठ्‍या संख्येने उपस्थित झाली होती. तेव्हा जगातील सर्वश्रेष्टदानी कोण? तर सगळ्यांनी एकमुखाने राजा विक्रमादित्यचे नाव घेतले. तेव्हा विक्रमादित्य जनतेच्या उत्तराने समाधानी झाले. तितक्यात राजाचे लक्ष एक ब्राह्मणाकडे गेले. तो कुठलीच प्रतिक्रिया देत नव्हता. मात्र त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होते की, तो जनतेच्या मताशी असहमत होता. विक्रमाने त्याला त्याचे गप्प बसण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, ''जनतेच्या विरोधी मत कोण ऐकणार?''

त्याने सांगितले. राजा विक्रमादित्य दानी आहे परंतू सर्वश्रेष्ट दानी तर समुद्र पलिकडच्या देशात राजा कीर्कित्तध्वज तर दररोज एक लाख सूवर्ण मोहरा दान केल्याशिवाय अन्न-पाणी ग्रहण करीत नाही. हे ऐकून राजा विक्रमच्या विशाल भोज कक्षात सर्वत्र शांतता पसरली. ब्राह्मणाने सांगितले, कीर्कित्तध्वजच्या राज्यात तो काही दिवस होता. दररोज तोही सूवर्ण मोहरा घेण्यासाठी जात असे.

राजा विक्रमादित्य ब्राह्मणाणाच्या स्पष्टोकत्तीवर प्रसन्न झाला व त्याला बक्षीस देऊन त्याला रवाना केले. तो गेल्यानंतर राजाने सामान्य पुरुषांचा वेश धारण करून दोन वेताळांचे स्मरण केले. वेताळ उपस्थित झाल्यानंतर त्यांनी राजाला राजा कीर्तीत्तध्वजच्या राज्यात पोहचविले. कीर्कित्तध्वज राज्याच्या महलात पोहचल्यानंतर उज्जयिनी नगरीतील एक सामान्य व्यक्ती असल्याचा राजा विक्रमने स्वत:चा परिचय करून दिला व कीर्कित्तध्वजला भेटण्‍याची इच्छा त्याने व्यक्त केली. थोड्याच वेळात त्याला राजा कीर्कित्तध्वजसमोर उभे करण्यात आले. त्या नागरिकाने अर्थात राजा विक्रमाने दरबारात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

राजा कीर्कित्तध्वजने त्याला द्वारपाल म्हणून नियुक्त करून टाकले. राजा कीर्कित्तध्वज खरोखरच दररोज एक लाख सूवर्ण मोहरा दान केल्याशिवाय अन्न- पाणी ग्रहण करूत नव्हता. राजा विक्रमने पाहिजे. काही दिवस तेथे राहिल्यानंतर राजा विक्रमाच्या लक्षात आले की, राजा कीर्कित्तध्वज रोज संध्याकाळी एकटा कुठे तरी निघून जातो व परत येताना त्याच्या हातात एक लाख सूवर्ण मोहरा भरलेली थैली असते. राजाला ते पाहून आश्चर्य वाटले.
एके संध्याकाळी राजा विक्रम राजा कीर्कित्तध्वज पाठोपाठ गेला. राजा कीर्कित्तध्वज समुद्रात स्नान करून एका मंदिरात प्रवेश केला. एक मूर्तीची पूजा करून उकळत्या तेल्याच्या कढाईत उडी घेतली.

काही वेळात तेथे काही डाकिनी येतात व कढाईत‍ील जळालेले राजाचे शरीर बाहेर काढून खावून संतुष्ट होतात. डाकिनी गेल्यानंतर मूर्तीतील देवी प्रगट होते व राजावर अमृत शिंपळते व राजा कीर्कित्तध्वज पुन्हा जिवंत होतो. देवी त्याला एक लाख सूवर्ण मोहरा देतो व अदृश्य होऊन जाते. नंतर राजा कीर्तीत्तध्वज खूष होऊन महालात परतोत.

पुढील दिवशी राजा कीर्कित्तध्वज सूवर्ण मोहरा घेऊन गेल्यानंतर राजा विक्रमाने ही स्नान करून देवीची पूजा केली व तेलाच्या कढाईत उडी घेतली. डाकिनी आल्या त्यांनी राजा विक्रमाचे भागलेले शरीर काढून नोचून नोचून खाऊन निघुन गेल्या. त्यानंतर देवी प्रगट झाली. तिने राजाला जिवंत केले. त्याला एक लाख मोहरा देऊ केल्या परंतु देवीच्या कृपेने त्याच्याकडे सारेकाही असे सांगून राजाने नागरल्या. राजाने अशी ‍क्रिया सात वेळा केली. देवी राजावर प्रसन्न होऊन त्याला वर मागितला. राजाने देवीला सूवर्ण मोहरा ज्या थैलीतून निघतात तीच थैली मागितली. देवीने ती थैली राजा विक्रमला देऊन टाकली. काही क्षणातच तेथील मंदिर, देवीची मूर्ती अदृश्य झाली.

दुसर्‍या दिवशी राजा कीर्कित्तध्वज जेव्हा समुद्र किनार्‍यावर आला तेव्हा त्याला काहीच न दिसल्याने तो निराश झाला. अनेक वर्षांपासून त्याचा एक लाख मोहरा दान करण्‍याचा नियम तुटला. त्याने त्यादिवसापासून अन्न-पाणी यांचा त्याग केला. राज्यकारभाराकडे त्याचे दूर्लक्ष झाले. तो आपल्या कक्षातून बाहेरही पडत नव्हता. त्याचे शरीर क्षीण होऊ लागले. राजा विक्रम त्याच्या कक्षात गेला. राजाच्या निराशपणाचे त्याने कारण विचारताच त्याने राजा विक्रमाला सारी हकिकत सांगितली. राजा विक्रमला देवीने दिलेली थैली राजा कीर्तीत्तध्वजला देऊन टाकली.

राजा कीर्कित्तध्वजने राजा विक्रमाला सांग‍ितले की, तूच धर्ती वरील सर्वश्रेष्‍ठ दानी पुरुष आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हत्ती आणि सिंहाची गोष्ट

Quick Recipe : अंड्याचा पराठा

3 Warning Signs of Heart Attack या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमचा जीव जाऊ शकतो

Carrot Pickle Recipe गाजराचे लोणचे बनवण्याची सोप्पी पद्धत

एमबीए इन मटेरियल मैनेजमेंट मध्ये करिअर करा

Show comments