तापलेल्या तेलात मोहरी घाला आणि ती तडतडू लागल्यावर, आच मंद करा. लाल तिखट, मीठ, हिंग आणि हळद घाला आणि 3 मिनिटे ढवळा. आता आच बंद करा आणि थोडावेळ थंड होऊ द्या. कापलेल्या कैरीवर हे मिश्रण घाला आणि चांगले मिसळा. कैरी मुरण्यासाठी हे 7-8 दिवस ठेवा. तुम्ही याचा ताजेपणा टिकविण्यासाठी डिस्टिल्ड व्हिनेगरसुद्धा घालू शकता.