साहित्य : अर्धीवाटी शिजवलेली तूरडाळ, पाव किलो टोमॅटो, एक चमचा जिरे, 10-12 हिरव्या मिरच्या, ओल्या नारळाचा किस, कोथिंबीर, कढीपत्ता.
कृती : सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक करून घ्या. फोडणी देऊन त्यात सर्व टोमॅटोचे पाणी, शिजवलेली डाळ, सर्व मसाला कुटून 10 मिनिटे उकळू द्या. वरून खोबर्याचा किस, कोथिंबीर टाका. हे सांबार खिचडी, इडली, वडा, डोसा बरोबर ही घेता येईल. ते नुसते पिण्यासही चविष्ट लागेल.