Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजिंक्य राहाणेच्या प्रतिभेस न्याय केव्हा मिळणार?

मनोज पोलादे
अजिंक्य राहाणे या युवा फलंदाजाने रणजी क्रिकेटमध्ये एका हंगामात ११०० धावा ठोकल्या, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये
PTI
PTI
आतापर्यंत जवळपास सत्तरच्या सरासरीने धावा केल्या, उदयोन्मुख खेळाडू स्पर्धेत ऑस्ट्रेलियात २ शतकांसह सत्तरच्या सरासरीने धावा, इंग्लंडच्या दौर्‍यावर भारतीय संघासाठी दमदार फलंदाजी करून दौर्‍याचे चित्र पालटवण्यात प्रमुख भूमिका आणि सद्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावांसह 'ऑरेंज कॅप'चा मानकरीही तोच आहे. मात्र भारतीय संघात स्थान कायम करण्यासाठी बहुधा ही कामगिरी पुरेशी नसावी, कारण आजही तो भारतीय क्रिकेट संघाचा कायम सदस्य नाही.


एखाद्या तरूण क्रिकेटपटूने स्वत:स सिद्ध करण्यासाठी आणखी कोणत्या कसोट्या पार करायला पाहिजे. देशाअंतर्गत आणि देशाबाहेर विभिन्न वातावरण व दर्जेदार संघांविरूद्ध आव्हानात्मक परिस्थितीत त्याने उपयुक्तता सिद्ध केली आहे. तंत्रशुद्ध फलंदाजाकडे असायला पाहिजे ते सर्वच फटके त्याच्या भात्यात आहे. तो ड्राइव्ह, पुल, लेट कट यांसारखे फटके अप्रतिम खेळतो. खेळपट्टीवर कोणत्याही संघाविरूद्ध आणि गोलंदाजासमोर चौफेर फटकेबाजी करून सतत धावफलक हलता ठेवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.


मात्र तरिही ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर महान भारतीय फलंदाजी एकाही डावांत ३०० चा आकडा पार करू शकली नसताना त्याला बेंच उबवण्यास भाग पाडण्यात आले. त्याला संधी देण्यात आली असती तर भारतीय फलंदाजीवर सकारात्मक प्रभाव पडण्यासोबतच युवा खेळाडूस सर्वोत्कृष्ट संघाविरूद्ध त्यांच्याच देशात खेळण्याचा अनुभव प्राप्त होण्यासोबतच संघबांधणीचा पाया रचल्या गेला असता. द्रविड, लक्ष्मण, सचिन यांचा काळ संपला असताना भविष्यातील संघबांधणीच्या दृष्टिने निवडकर्त्यांनी योग्य वेळ साधली. मात्र संघव्यवस्थापणाने अजिंक्यला एकाही सामन्यात न खेळवून त्या प्रयत्नांवर पाणी फेरले.

भारतीय संघ गर्तेत डुबला असताना, नाकातोंडात पाणी जात असताना, ऑस्ट्रेलियासारख्या देशात संघाची नाचक्की होत असताना संघ व्यवस्थापणाने अजिंक्य राहाणेचा संघात समावेश का केला नाही. त्यामागे कारण आहे ते वरिष्ठ खेळाडूंचा दबाव आणि संघीय राजकारण. ढिसाळ कामगिरी करत असतानाही संघातील आपले महत्त्व आणि स्थान कायम राहावे, या अट्टाहासापायी नवख्या प्रतिभेचा बळी जात असतो. संघाचा कर्णधार आणि व्यवस्थापन हे वरिष्ठ खेळाडूंसमोर दुबळे पडते हे आपण ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर अनुभवलेच आहे. त्यांना संघहिताशी, देशाच्या स्वाभिमानाशी काही देणे-घेणे नसते. त्यांना काहीही करून स्वत:च्या कारकीर्दी लांबवायच्या असतात बस!
२०१५ मधील विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची बांधणी करायची असल्यास तेव्हा भारतीय पराक्रमाचा झेंडा फडकावेल अशा प्रतिभेस आतापासूनच संधी द्यावी लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संघव्यवस्थापनास ठोस धोरणनिश्चिती करून कठोर पावले उचलावी लागतील.

२०१५ मधील विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची बांधणी करायची असल्यास तेव्हा भारतीय पराक्रमाचा झेंडा फडकावेल अशा प्रतिभेस आतापासूनच संधी द्यावी लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संघव्यवस्थापनास ठोस धोरणनिश्चिती करून कठोर पावले उचलावी लागतील.

अजिंक्य हा लढवय्या क्रिकेटपटू आहे. रणांगणात उतरल्यावर हार मानायची नाही, शस्त्र खाली ठेवायची नाही, या निश्चियाने तो सारखा लढत आहे. प्रचंड आशावादाच्या जोरावर त्याचा संघर्ष सुरू आहे. त्याचा संघर्ष फळास येईल, त्याच्या प्रतिभेस न्याय मिळेल, अशी आशा करूया!
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतणार,ऑस्ट्रेलिया दौरा मध्यंतरी सोडणार

IPL Auction: IPL 2025 चा मेगा लिलाव संपला, पंत राहिला सर्वात महागडा खेळाडू, वैभव बनला करोडपती

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

Ipl mega auction : व्यंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय बनला

IPL Auction: लिलावात पंत बनला सर्वात महागडा खेळाडू

Show comments