Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टेनिस जगातील सम्राट 'रॉजर फेडरर'

जितेंद्र झंवर

Webdunia
विंबल्डनच्या हिरवळीचे आकर्षण प्रत्येक टेनिसपटूला असते. या हिर‍वळीवर खेळण्यास मिळावे, हे स्वप्न अनेक टेनिसपटू उराशी बाळगतात. या विंबल्डनच्या हिरवळीवर एक नाही, दोन नाही...तब्बल सहा वेळा विजेतेपद मिळाले तर...या पराक्रमास सर्वात जास्त ग्रॅंण्डस्लॅम विजेतेपद मिळविण्याच्या भीम पराक्रमाची जोड मिळाली तर...मग असा व्यक्ती टेनिस जगातील अनभिषिक्त सम्राटच असणार ना? हा नवीन सम्राट आहे ' रॉजर फेडरर'

NDND
स्वित्झर्लंडमधील वोलेरौ शहरात आठ ऑगस्ट 1981 रोजी जन्मलेल्या रॉजर फेडरर याने व्यावसायिक टेनिस विश्वात 1998 साली पाऊल ठेवले. अवघ्या दहा वर्षांच्या टेनिस कारकिर्दीत अविश्वसनीय कामगिरी करीत टेनिस जगातील सम्राट बनला. आपल्याकडे ज्या वयात शाळेत पहिले पाऊल टाकतात त्या वयात म्हणजेच सहाव्या वर्षीच त्याने टेनिसची रॅकेट हातात धरली. नवव्या वर्षी टेनिसचे शास्त्रोक्त धडे गिरविण्यास प्रारंभ केला. वयाच्या 12 वर्षांपर्यंत टेनिसबरोबर फुटबॉलचा आनंद घेतला. 14 व्या वर्षीच स्वित्झर्लंडमध्ये टेनिसचा राष्ट्रीय विजेता तो झाला. पाठोपाठ ‍कनिष्ठ गटातील विंबल्डनचे विजेतेपदही पटकविले.

बालवयातच आपल्या अनोख्या कामगिरीने टेनिस जगाचे लक्ष वेधल्यानंतर व्यावसायिक टेनिस विश्वाचे त्याने अनेक गड सर केले. दोन फेब्रुवारी 2004 ते 17 ऑगस्ट 2008 असे तब्बल 237 आठवडे टेनिसमधील अव्वलस्थान आपल्याजवळ राखले. आता 15 ग्रॅंण्डस्लॅम मिळविण्याचा पराक्रम केल्यावर पुन्हा पहिल्या क्रमांकावर तो पोहचला आहे. ऑलिंपिकमधील दुहेरीचे सुवर्णपदक त्याने मिळविले आहे. टेनिस जगातील दहा वर्षांत त्याने अनेक शिखरे पादाक्रांत केली. टेनिसमधील जे स्वप्न पाहिले ते त्याने पूर्ण केले.

फेडररने सहा विंबल्डन (2003,2004,2005,2006,2007 आणि 2009), पाच अमेरिकी ओपन (2004,2005,2006,2007,2008), तीन ऑस्ट्रेलियन (2004,2006,2007) आणि एक वेळेस फ्रेंच ओपन (2009) स्पर्धा जिंकली आहे. ग्रॅंडस्लॅम स्पर्धांत सर्वाधिक वीस वेळा अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रमही फेडररच्या नावावर आहे. ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत 20 वेळा पोहचण्याचा विक्रम करणारा तो एकमेव खेळाड़ आहे. या सर्व पराक्रमांमुळे तो टेनिसमधील सर्वकालिन महान खेळाडू ठरला आहे.

NDND
टेनिसबरोबर आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव फेडररला आहे. यामुळेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्याचे सामाजिक उपक्रम सुरु असतात. त्याने सन 2003 मध्ये 'रॉजर फेडरर फॉंडेशन'ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीत राहणार्‍या मुलांच्या विकासासाठी तो काम करतो. तसेच मुलांना खेळाकडे आकर्षित करण्याचे कामही या संस्थेमार्फत सुरु असते. यूनोच्या 'युनिसेफ' या मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेचा राजदूत म्हणून सन 2006 मध्ये त्याने काम केले. तामिळनाडूमधील त्सुनामीग्रस्त मुलांच्या मदतीसाठी तो धावून आला होता. एड्ससंदर्भात जनजागृती करण्याचे काम त्याने केले आहे.

रॉजर फेडरर हा टेनिस बरोबर फुटबॉलही चांगला खेळतो. टेनिस कारकीर्द सुरु करण्यापूर्वी व्यावसायिक फुटबॉलपटू होण्याचे त्याची महत्वाकांक्षा होती. क्रिकेट सामने पाहण्याचा छंदही त्याला आहे. टेनिस जगातील सम्राट असलेला फेडरर तंदुरुस्त राहिला तर आणखी किमान तीन वर्ष तरी या खेळाचा आनंद घेणार आहे. मग त्याच्या विजेतेपदांची यादी वाढत जाणार आहे. कारण टेनिस कोर्टावर वर आपले सर्वस्व पणाला लावतो आणि जिंकण्यासाठी नेहमीच आतुर असतो.

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

आता शेवटचे दिवस मोजा, खासदार पप्पू यादवांना पुन्हा धमकी

शरद पवारांच्या उमेदवाराचे अजब आश्वासन, मी निवडणूक जिंकलो तर तरुणांचे लग्न लावून देईन

मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत 2 महिला कॉन्स्टेबलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

जम्मू-काश्मीर : भारतीय लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

ज्यांना बजरंगबली आवडत नाही त्यांनी पाहिजे तिथे जावे, महाराष्ट्रात गरजले योगी आदित्यनाथ

Show comments