येत्या दिवसांत तेही स्पष्ट होईल. क्रिकेटमधील अविश्वसनीय विक्रम त्याच्या नावांवर जमा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'शतकांचे शतक'ही त्याने साकार केले. क्रिकेटमधील 'एव्हरेस्ट' तो गाठून चुकला आहे. तो आता ३९ वर्षाचा झाला असून या वयात सतत स्पर्धात्मक क्रिकेट खेळणे त्याच्यासाठी शक्य नाही. हे वारंवार सिद्ध झाले आहे. सद्या तो निवडक स्पर्धांत खेळणे पसंत करतो. हे लक्षात घेता एका 'इनिंग'ची सांगता करून दुसर्या 'इनिंग'चा शुभारंभ करण्याची ही योग्य वेळ आहे.
इतक्यातील सचिनच्या निर्णयांकडे बघितल्यास तो या विचारात असल्याचे स्पष्ट होते. व्यावसायिक लीग स्पर्धेतील संघ मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून तो नुकताच मुक्त झाला आहे. तंदुरूस्तीच्या कारणाने तो आयपीएलमधील सुरूवातीचे सामने खेळू शकला नाही. या पार्श्वभूमीवर त्याचे राज्यसभेवर नामांकन होणे हे तो दुसर्या इनिंगचा गांभीर्याने विचार करत असल्याचेच स्पष्ट करते.
आपण क्रिकेटला योगदान देऊ शकतो तोपर्यंत खेळत राहू, असे त्याने अगोदरच स्पष्ट केले आहे. मात्र त्याने फक्त 'टेस्ट' खेळू, असे सांगून पत्तेही उघड केलेले नाही. त्याचा निर्णय अजून गुलदस्त्यात आहे. मात्र घडामोडींचा अन्वयार्थ लावल्यास सचिन आता वनडेमधून निवृत्ती घेऊन टेस्ट क्रिकेट खेळत राहील, अशी एक शक्य
मात्र घडामोडींचा अन्वयार्थ लावल्यास सचिन आता वनडेमधून निवृत्ती घेऊन टेस्ट क्रिकेट खेळत राहील, अशी एक शक्यता आहे. भारत सद्या वर्षातून ५-७ टेस्ट सामने खेळत आहे. हे बघता क्रिकेट खेळत राहून राज्यसभेचा सन्माननीय सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडणे शक्य आहे.
ता आहे. भारत सद्या वर्षातून ५-७ टेस्ट सामने खेळत आहे. हे बघता क्रिकेट खेळत राहून राज्यसभेचा सन्माननीय सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडणे त्याच्यासाठी शक्य आहे.
कला, साहित्य, संस्कृती, खेळ, सामाजिक कार्य या क्षेत्रातील व्यक्तींचे राज्यसभेवर नामांकन झाल्यावरही ते आपापल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असतातच. ही सन्मानीय नियुक्ती असून त्यासाठी आपले कार्यक्षेत्रातून निवृत्ती घेण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांचा त्या क्षेत्रातील कामगिरीचाच तो सन्मान असतो. फक्त त्या अनुभवाचा, ज्ञानाचा देशास लाभ व्हाया, या हेतूने राष्ट्रपती विविध क्षेत्रातील १२ व्यक्तींना संसदेत पाठवत असते. याअगोदर लता मंगेशकर, पंडित रविशंकर, एम. एफ्. हुसेन यांचीही सचिनसारखीच नियुक्ती झाली होती.
हा झाला अन्वयार्थ मात्र सचिन नेमके काय करतो हे येत्या दिवसात स्पष्ट होईलच. सचिन दोन्ही जबाबदार्या लक्षात घेऊनच निर्णय घेईल. कारण तो परफेक्शनिस्ट आहे. क्रिकेटसारखीच राज्यसभे
राज्यसभेची जबाबदारीही तो तितक्याच गांभीर्याने घेईल. म्हणूनच तो वनडे क्रिकेटला अलविदा करून हळुवारपणे दुसर्या इनिंगकडे अग्रेसर होण्याची दाट शक्यता आहे.
ची जबाबदारीही तो तितक्याच गांभीर्याने घेईल. म्हणूनच तो वनडे क्रिकेटला अलविदा करून हळुवारपणे दुसर्या इनिंगकडे अग्रेसर होण्याची दाट शक्यता आहे.