Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अर्जेंटिना २४ वर्षांनी फायनलमध्ये

Webdunia
गुरूवार, 10 जुलै 2014 (10:18 IST)
फिफा विश्वचषकाच्या दुस-या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड यांच्यात लढत झाली. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या ऑरेंज आर्मीशी मेस्सी ब्रिगेडची झूंज असल्याने हा सामना रंगतदार होणार अशी अपेक्षा होती. दोन्ही संघांनी अपेक्षेप्रमाणे एकमेकांना काटे की टक्कर दिली.  पहिल्या भागात दोन्ही संघांनी एकमेकांना गोलपोस्टपासून दूरच ठेवले होते. १५ व्या मिनीटाला अर्जेंटिनाच्या मेस्सीने मारलेली जबरदस्त किक नेदरलँडचा गोलकिपर सिल्लेसेने रोखली. तर नेदरलँडलाही अर्जेंटिनाची बचाव फळी भेदताच येत नव्हती. नेदरलँडचा स्ट्रायकर अर्जेन रॉबेलकडे चेंडू येताच अर्जेंटिनाचे दोन ते तीन खेळाडू त्याच्या भोवती दिसायचे. तर अर्जेंटिनाच्या मेस्सीलाही नेदरलँडने अशाच पद्धतीने लॉक केले. 
 
दुस-या हाफमध्ये नेदरलँड आणि अर्जेंटिना दोन्ही संघांनी आक्रमकपणे खेळ करुन एकमेकांच्या गोलपोस्टच्या दिशेने हल्लाबोल केला. सामन्याच्या शेवटच्या १५  मिनीटांमध्ये अर्जेंटिनाने गोल करण्यात यश मिळवले खरे मात्र ऑफसाइडमुळे हा गोल अपात्र ठरवण्यात आला. शेवटच्या मिनीटाला नेदरलँडच्या आघाडीवर अर्जेन रॉबेनला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र अर्जेंटिनाच्या बचाव फळीमुळे रॉबेनला गोल करण्यात अपयश आले. 
 
९० मिनीटांमध्ये दोन्ही संघांना गोल मारण्यात अपयश आल्याने अतिरिक्त अर्धा तासाचा वेळ देण्यात आला. मात्र यातही दोन्ही संघांनी गोल केला नाही. शेवटी पेनल्टी शूटद्वारे सामन्याचा निकाल ठरला. 
 
पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलकिपर रोमेरोने उत्कृष्ट बचाव करत संघाला अंतिम सामन्यात नेले. रोमेरोने नेदरलँडच्या व्लार आणि वेसली स्नायडर या दोघांनी मारलेल्या किकवर उत्कृष्ट बचाव करत अर्जेंटिनाला विजयी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाच्या मेस्सीने संघाला पहिल्याच किकमध्ये यश मिळवून दिले.  यानंतर अर्जेंटिनाच्या मॅक्सी रॉड्रीग्जने चौथी आणि निर्णायक किकवर गोल मारुन रोमेरोने रचलेल्या पायावर कळस ठेवला. पेनल्टी शूट आऊटमध्ये नेदरलँडला फक्त दोनच गोल करता आले.  तर अर्जेंटिनाने चारही किकवर  गोल मारल्याने  नेदरलँडचा ४-२ ने पराभव झाला. 

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

Show comments