Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हीनस पहिल्याच फेरीत आऊट!

वेबदुनिया
WD
महिला विभागात पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली. व्हीनस विल्यम्सला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत यावेळी प्रथमच मानांकन देण्यात आले नव्हते. अमेरिकन टेनिसपटू व्हीनसला पहिल्या फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत ७९ व्या स्थानावर असलेल्या रशियाच्या एलिना व्हेसनिनाविरुद्ध १-६, ३-६ ने पराभव स्वीकारावा लागला. व्हेसनिनाला दुसर्‍या फेरीत तिसर्‍या मानांकित पोलंडच्या अँग्निस्का रादवांस्काच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. महिला विभागातील अन्य सामन्यात ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन सामंता स्टोसूर व लि ना यांनी सहज विजयाची नोंद करीत दुसरी फेरी गाठली. तसेच अग्र मानांकित मार िया शारोपोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या अनास्थिसिया रॉडीनोव्हाला सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ असे नमवित दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. गतविजेता अव्वल मानांकित जोकोव्हिचने पहिल्या फेरीच्या लढतीत स्पेनच्या जुआन कोलरेस फरेरोचा ६-३, ६-३, ६-१ ने सहज पराभव केला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत नदालविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पहिली लढत खेळणार्‍या जोकोव्हिचने आज चमकदार खेळ केला. सातव्यांदा जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने उतरलेल्या रॉजर फेडररने स्पेनच्या अल्बर्ट रामोसचा ७९ मिनिटाच्या लढतीत ६-१, ६-१, ६-१ असा पराभव करत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

Show comments