Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरिता देवी, शिवा थापाला संधी

Webdunia
मंगळवार, 1 डिसेंबर 2015 (09:14 IST)
शिवा थापा तसेच एक वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा स्पर्धात्मक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणारी एल. सरिता देवी यांच्यासह तेरा खेळाडूंचा भारतीय संघ चीनमध्ये बॉक्सिंगचा सराव व स्पर्धा करिता जाणार आहे. या दौ-यास एक डिसेंबर रोजी प्रारंभ होत आहे. 
 
भारतीय संघ तेरा दिवसांचा दौरा करणार असून, त्यामध्ये क्विनान येथे होणा-या आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या स्पर्धेतही सहभागी होणार आहे. या स्पर्धेत चीन, थायलंड, मंगोलिया व दक्षिण कोरियाच्या स्पर्धकांचा समावेश असेल. भारतीय संघात दहा पुरुष व तीन महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मार्चमध्ये होणा-या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी हा स्पर्धात्मक सराव भारतीय खेळाडूंना उपयुक्त ठरणार आहे. 
 
भारतीय संघाचे प्रशिक्षक गुरुबक्षसिंग यांनी सांगितले, या दौ-यात स्पर्धेचाही समावेश असल्यामुळे खेळाडूंना खूपच फायदा होणार आहे. या स्पर्धेत अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होत असल्यामुळे त्यांच्याकडून आमच्या खेळाडूंना खूप काही शिकावयास मिळणार आहे. 
 
भारतीय संघ : पुरुष-एल. देवेंद्रसिंग (४९ किलो), गौरव बिधुरी (५२ किलो), शिवा थापा (५६ किलो), मनीष कौशिक (६० किलो), थॉमस मतेई (६४ किलो), मनदीप जांगरा (६० किलो), विकास कृष्णन (७५ किलो), कुलदीपसिंग (८१ किलो), अमृतप्रीतसिंग (९१ किलो), नरेंद्रकुमार (९१ किलोवर), महिला : पिंकी जांगरा (५१ किलो), एल. सरिता देवी (६० किलो), पूजा राणी (७५ किलो).

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

Show comments