Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वय घोटाळा : १८ अ‍ॅथलिटस् माघारी !

वेबदुनिया
ओव्हरएजमुळे भारताच्या १८ युवा अ‍ॅथलिटपटूंना माघारी पाठवण्यात आले आहे. नानजिंग एशियन युथ गेम्समध्ये भाग घेण्यासाठी हे अ‍ॅथलिट गेले होते. या अ‍ॅथलिटपटूंचे वय १६ वर्षांच्या आत असणे गरजेचे होते. परंतु त्यांचे वय जास्त निघाल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. बहुतेक अ‍ॅथलिटपटूंची निवड एएफआयने (अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया) केली होती.

२७ अ‍ॅथलिटपटूंचा संघ चीनला रवाना झाला होता परंतु १८ अ‍ॅथलिटपटूंचे वय जादा निघाल्याचे त्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली नाही. सध्या ‘आओए’ वर (इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन) निलंबन असल्याने या अ‍ॅथलिटपटूंना ‘इंडिपेंडन्ट ऑलिम्पिक अ‍ॅथलिटस्’ नावाखाली स्पर्धेत पाठवण्यात आले होते. स्पर्धेपूर्वी दोन दिवस आधी चार भारतीय बॅडमिंटनपटू नानजिंगमध्ये दाखल झाले. ते स्पर्धास्थळी दाखलही झाले नव्हते. पण त्या आधीचे त्यांना माघारी परतण्याचे आदेश देण्यात आले. एएफआयचा असा समज झाला की, युथ गेम्समध्ये ‘आयएएफ’ ची (इंटरनॅशनल अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनची नियमावली पाळली जाईल. त्यानुसार १९६६ नंतर जन्मलेला खेळाडू स्पर्धेसाठी पात्र मानला जातो. त्यानुसारच खेळाडूंची निवड करण्यात आली होती. परंतु गेम्समध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची (आयओसी) नियमावली लागू करण्यात आली. या संबंधीची सूचना प्रत्येक फेडरेशनला देण्यात आली, असावी परंतु ती वाचण्याची तसदी देण्यात आली नसावी. अश्चर्याची गोष्ट म्हणजे या खेळाडूंची नावे आयओए किंवा साईकडे पाठवण्यात आली तेव्हा त्यांच्या वयाविरूद्ध कोणीही आक्षेप घेतला नाही. स्पर्धा आयोजकांनीसुद्धा ऑनलाईन अर्ज नाकारले नाहीत. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मात्र त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. निलंबित आयओएचे अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा म्हणाले, या प्रकरणी भारतीय दलाने माझ्याकडे तक्रार नोंदवली आहे.

मी एकूण प्रकरणाची शहानिशा करीत असून, नक्की काय घडले याचा खुलासा करण्यास एएफआयला सांगण्यात आले आहे. ‘साई’ चे पदाधिकारी म्हणाले, खेळाडूंना अपात्र घोषित केले असेल तर ते प्रामुख्याने ‘एएफआय’ च्या चुकीमुळेच. अ‍ॅथलिटपटूंची निवड चाचणी थिरूवनंथपूरम् येथे घेण्यात आली होती. एएफआयनेच त्यांची निवड केली होती. त्यामुळे जे काही घडले त्याला एएफआयच जबाबदार आहे. अथलिटपटूंना हिरवा कंदील दावण्याआधी एएफआयने त्यांच्या वयाची तपासणी का केली नाही, असे विचारले असता साईचे डायरेक्टर जनरल जिजी थॉम्पसन म्हणाले, जेव्हा आमच्याकडे फेडरेशनकडून यादी येते तेव्हा त्याविरूद्ध आम्ही आक्षेप घेत नाही. कारण खेळाडूंची निवड करणे हे त्यांचे काम आहे. आम्हाला मदत करा, असे फेडरेशनने आम्हास सांगितले तरच आम्ही त्यात लक्ष घालतो.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

Show comments