Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विम्बल्डन खुले टेनिस; लिएंडर पेस तिसर्‍या फेरीत

Webdunia
सोमवार, 30 जून 2014 (11:56 IST)
येथे ऑल इंग्लंड क्लबच्या हिरवळीच्या कोर्टवर खेळल जात असलेल्या विम्बल्डन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस सर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या लिएंडर पेसने तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.
 
परंतु सानिया मिर्झाला मात्र महिला दुहेरीच्या दुसर्‍या फेरीत पराभवास सामोरे जावे लागले आहे. 
 
या स्पर्धेमध्ये सहाव्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वेळापत्रकात विस्कळीतपणा आला आहे. जोरदार पावसाने शनिवारी दुपारनंतर खेळ थांबला होता. मेक्सिको आणि अमेरिकेची जोडी सॅन्टिआगो गोनझालेझ आणि स्कॉट लिपसस्की हे पहिल्या सेटसमध्ये 2-1 ने पुढे होते. लिएंडर पेस व राडेक स्टेपानेकविरध्द हा सामना खेळला जात होता. पावसानंतर हा सामना दहा क्रमांकाच्या कोर्टवर हलविण्यात आला. त्यावेळी अनुभवी लिएंडर पेस आणि राडेक स्टेपानेक या जोडीने दुसर्‍या फेरीत अनमानांकीत जोडी गोनझालेझ लिपस्की यांचा 3-6,6-1, 3-6, 6-3, 11-9 अशा तीन तासाच लढतीनंतर पराभव केला. पहिल्या चार सेटसनंतर 2-2 अशी बरोबरी होती. दोन्ही संघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. शेवटचा सेट्स एक तास पंधरा मिनिटे खेळल्या गेला. या सेटसमध्ये पेस आणि स्टेपानेक यांनी जबरदस्त सर्व्हिसवर विजय मिळविला. कोर्ट क्रमांक 11 वर सानिया आणि झिम्बाब्वेची तिची साथीदार कारा ब्लॅक या जोडीला पराभवास सामोरे जावे लागले. अँनॅस्टेशिया पावली उचेनकोव्हा आणि लुसी सफरोव्हा या जोडीने सानिया आणि कारा ब्लॅक या जोडीचा 2-6, 7-6 (7),  6 -4 असा पराभव केला. तिसर्‍या निर्णायक सेटसमध्ये सानिया-ब्लॅक यांना आपला सूर राखता आला नाही. 

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Show comments