भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिला मलेशियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. तिला एलिनी डानिलिडोऊ हीने 6 -2, 1-6, 6-4 असे पराभूत केले.
पहिला सेट गमावल्यानंतरही सानियाने दुसरा सेट जिंकून सामना बरोबरीत आणला होता. मात्र तिला तिसर्या सेटमध्ये हीच लय कायम राखता आली नाही. त्यामुळे तिला पराभव पत्कारावा लागला.