rashifal-2026

सानिया महिला दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल

Webdunia
सोमवार, 13 एप्रिल 2015 (11:18 IST)
सानिया मिर्झाने जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीमध्ये अव्वल स्थान पटकावत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. महिला दुहेरीमध्ये अव्वल ठरणारी सानिया ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. सानियाने मार्टिना हिंगीसच्या साथीने फॅमिली सर्कल कप खिशात घातला.
 
सानिया आणि मार्टिना या जोडीने कॅसी डेलाक्वा आणि दार्या जुराक या जोडीवर 6-0, 6-4 अशी मात केली. विजेतेपदासोबतच सानियाने अव्वल स्थानालाही गवसणी घातली आहे.इंडियन वेल्स आणि मयामि ओपनपाठोपाठ सानिया आणि मार्टिनाचे हे सलग तिसरे जेतेपद ठरले. सानिया आणि मार्टिनाने टीम म्हणून सलग 14 वेळा विजय मिळवला आहे.
 
महिला दुहेरीमध्ये अव्वल ठरणारी सानिया ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी 90च्या दशकात लिअँडर पेस आणि महेश भूपतीने अशी कामगिरी बजावली होती. काही दिवसांपूर्वीच बॅडमिंटनमध्ये फुलराणी सायना नेहवालने पहिले स्थान पटकावले होते. त्यानंतर टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत सानियाने मिळवलेल्या वर्चस्वामुळे भारतीयांची कॉलर पुन्हा टाईट झाली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ब्रह्मोस अभियंता निशांत अग्रवाल यांची सात वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

LIVE: शिक्षकांनी टीईटीच्या आदेशाचा निषेध केला

नागपुरात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एनएचएम महिला कार्यकर्त्याने केली इच्छामरणची मागणी

१५ डिसेंबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यासह ठाण्यातील विकासकामांना गती मिळेल- मंत्री प्रताप सरनाईक

पाकिस्तानी आणि अफगाण सैनिकांमध्ये पुन्हा चकमक, सीमेवर जोरदार गोळीबार सुरू

Show comments