Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस

CWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस
मुंबई , गुरूवार, 12 एप्रिल 2018 (11:23 IST)
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 50 लाख रूपये, तर रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना 30 लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना 20 लाख रुपयांची रोख बक्षिसे देऊन गौरविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
राज्य शासनाकडून क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात येते. सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा-2018 मधील विविध पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
 
आतापर्यंत राष्ट्रकूल स्पर्धेत महाराष्ट्रातील मधुरिका पाटकर (टेबल टेनिस), पूजा सहस्त्रबुद्धे (टेबल टेनिस), सनिल शेट्टी (टेबल टेनिस), चिराग शेट्टी (बॅडमिंटन) यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच नेमबाजीत हीना सिद्धू यांनी 25 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्ण आणि 10 मीटर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले आहे.
 
या खेळाडूंना घडविणाऱ्या प्रशिक्षकांचा सुद्धा गौरव करण्यात येणार असून सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकास 12.50 लाख, रौप्य पदक प्राप्त खेळाडूंच्या मार्गदर्शकास 7.50 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकास 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा