Marathi Biodata Maker

गोपीचंद यांनी कन्येसाठी मला डावलले

Webdunia
शुक्रवार, 6 जुलै 2018 (14:05 IST)
बॅडटिंनपटू अपर्णा बालनचा गंभीर आरोप
 
भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मुलगी गायत्री हिची आशियाई खेळासाठी भारतीय बॅड‍मिंटन संघात निवड करण्यात आली आहे.
 
भारतीय बॅडमिंटन संघटनेने आशियाई खेळासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा केली. 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जाकार्ता शहरात आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पुरुष संघाचे नेतृत्व किदाम्बी श्रीकांतकडे तर महिला संघाचे नेतृत्व सायना नेहवालकडे सोपवण्यात आले आहे.
 
या संघातून अनुभवी महिला बॅडमिंटनपटू अपर्णा बालन हिला वगळण्यात आले होते. या संबंधी अपर्णा हिने बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (बाई) आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, कन्या गायत्री गोपीचंद आणि आकर्षी कश्यप यांच्याविरोधात केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
31 वर्षीय अपर्णा हिने 29 जून 2018 रोजी दाखल केलेल्या याचिकेत तिला संघातून वगळण्यात येणे हे अयोग्य आहे, असे म्हटले आहे. आपली कन्या गायत्री हिला संघात स्थान मिळावे, या कारणास्तव मला या संघातून वगळण्याचा निर्णय गोपीचंद यांनी घेतला असल्याचा आरोप तिने या याचिकेत केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

गॅस संकटामुळे मुंबईतील हॉटेल उद्योग अडचणीत, इंडक्शन स्टोव्हची मागणी ३० पटीने वाढली

मालाडमध्ये मुलींवर झालेल्या हल्ल्यानंतर तणाव वाढला, आरोपींच्या अटकेची मागणी तीव्र

9 कोटी रुपये किमतीचे प्रतिबंधित चीनी वॉकी-टॉकी जप्त, डीआरआयची मोठी कारवाई, दोघांना अटक

अमेरिकेतून एलपीजी घेऊन जाणारे जहाज मंगळुरूला दाखल, सरकारने बंदर शुल्क माफ केले

पुढील लेख
Show comments