suvichar

2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारत सर्वात जास्त पदक जिंकेल : राजवर्धनसिंग राठोड

Webdunia
गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (08:45 IST)
सध्या भारतीय युवा खेळाडूंचा कल विविध खेळांकडे वाढला असून आगामी 2028 ऑलंम्पिक स्पर्धेत भारताचे खेळाडू जास्तीत जास्त पदके मिळवतील आणि जास्त पदके मिळणाऱ्या देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश होईल असे वक्तव्य भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी पणजी येथे कार्यक्रमात बोलताना केले.
 
या कार्यकमात पुढे बोलताना राठोड म्हणाले, 2018 हे वर्ष भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी खूप चांगले गेले आहे. मला भारतातील युवा खेळाडूंकडून खूप अपेक्षा आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कर्तृत्वावर देखील विश्वास आहे. त्यांना संधी मिळण्यासाठी आम्ही प्रक्रिया चालू केली आहे. त्याचे फळ भविष्यात चांगले मिळेल.
 
टोकियो ऑलंम्पिक (2020) खूप जवळ आहे. आम्हाला माहिती आहे की आम्ही त्यात कशी कामगिरी करणार आहेत. त्यामुळे आमचे लक्ष्य हे 2024 आणि 2028 ऑलंम्पिकवर आहे. असे ही त्यांनी यावेळी नमूद केले. 2024 ऑलंम्पिक स्पर्धा पॅरिस शहरात होणार आहे तर 2028 ऑलंम्पिक स्पर्धा लॉस अँजेलीस येथे पार पडणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसने झीशान सिद्दिकी यांना उमेदवार म्हणून घोषित केले, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानसभेत दाखल

पुण्यात रासायनिक कंपनीत क्लोरीन वायू गळती, २४ जणांना श्वास घेण्यास त्रास, अनेक जण रुग्णालयात दाखल; तपास सुरू

सत्तासंघर्ष: सुनेत्रा पवार फडणवीसांच्या भेटीला; वर्षा बंगल्यावर तासभर चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

बच्चू कडू शिवसैनिक होणार? एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची घोषणा केली; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली

LIVE: माजी मंत्री बच्चू कडू आता शिवसेनेचे धनुष्यबाण उचलणार?

पुढील लेख
Show comments