Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले

Webdunia
रविवार, 17 जुलै 2022 (12:38 IST)
सिंगापूर- दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारताच्या पीव्ही सिंधूने रविवारी येथे महिला एकेरीच्या अंतिम फेरीत चीनच्या वांग झी यी हिचा तीन गेमच्या अंतिम सामन्यात पराभव करून सिंगापूर ओपन बॅडमिंटन सुपर 500 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
 
आशियाई चॅम्पियनशिपच्या गतविजेत्या चीनच्या 22 वर्षीय तरुणीला 21-9 11-21 21-15 असे पराभूत करताना सिंधूने निर्णायक क्षणी संयम राखला.
 
28 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणाऱ्या सिंधूचा या विजेतेपदामुळे आत्मविश्वास उंचावला आहे.
 
चालू मोसमातील सिंधूचे हे तिसरे विजेतेपद आहे. सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपन या दोन सुपर 300 स्पर्धा त्याने जिंकल्या. सिंधूने ऑलिम्पिकमधील रौप्य आणि कांस्य पदकांव्यतिरिक्त जागतिक स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments