Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोनाल्डो माझ्यासाठी प्रेरणादायी- विराट कोहली

Webdunia
फुटबॉलपटू रोनाल्डोची कार्यपद्रधती विलक्षण अशी आहे. त्यामुळेच तो अत्यंत प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या. गेली अनेक वर्ष तो सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने दमदार प्रदर्शन करत आहे. यामागचे कारण म्हणजे अथक मेहनत. प्रचंड कष्ट करून तंत्रकौशल्ये घोटीव करणारा फुटबॉलपटू अशी त्याने अढळस्थान पटाकावले आहे. लिओनेल मेस्सी महान खेळाडू आहे. मात्र, प्रचंड मेहनतीच्या बळावर सातत्याने खेळात सुधारणा करत रोनाल्डो मेस्सीला टक्कर देतो, असे कोहलीने सांगितले.
 
सदैव चांगली कामगिरी करण्याचे दडपण प्रत्येक क्रीडापटूवर असते. मात्र, तो त्याकडे कसा पाहतो यावर त्याची वाटचाल अवलंबून आहे. दडपणाचा आनंद घेण्यास मी सुरूवात केली आहे. दडपणाच्या परिस्थितीपासून पळून उत्तर सापडत नाही. कोणत्याही परिस्थितीतून पुनरागम करता यायला हवे. खेळात सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. सातत्य राखणे अत्यंत अवघड आहे. उणीवांचे रूपांतर बलस्थानांमध्ये करता येण्याची खुबी आत्मसात करणे अवघड कौशल्य आहे. माझा खेळ मी अधिक चांगल्या रितीने समजू लागलो आहे.
 
प्रत्येक खेळाडूत काही उणिवा, त्रुटी असतात. त्यावर मात करून वाटचाल करणष महत्त्वाचे असते, असे कोहलीने सांगितले. 2016 वर्षात सर्व प्रकारात मिळून सर्वाधिक धावांचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे.

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments