सर्गियो रामॉसच्या दुसर्याय हाफमधील पेनल्टीवर झालेल्या गोलच्या मदतीने रियल माद्रिदने अॅ्थलेटिक बिलबाओचा 1-0 ने पराभव करत सलग सातव्या विजयाची नोंद केली. या विजयासह मागील तीन वर्षात पहिल्यांदाच स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगा जिंकण्याच्या दृष्टिने मजबूतपणे आगेकूच केली.
रामॉसने पाचवा गोल केला ज्यामुळे रियल माद्रिदने बार्सिलोनावर चार गुणांची आघाडी कायम राखली. बार्सिलोनाने दुसर्याम अन्य एका सामन्यात पाचव्या स्थानी असलेल्या व्हेल्लारियालला 4-1 ने पराभूत केले. त्यांच्याकडून गोल करणार्यांमध्ये लुई सुआरेज व अँटोनी ग्रीजॅनचाही समावेश आहे ज्यांनी लियोनेल मेस्सीच्या मदतीने गोल केले.
रामॉसने 73 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून रियल माद्रिदला सलग सातवा विजय मिळवून दिला. माद्रिदचा संघ लीग पुन्हा सुरू झाल्यानंतर आपला विजयी क्रम सुरूच ठेवणारा एकमेव संघ आहे. रियल माद्रिदचे आता 34 सामन्यांमध्ये 77 गुण झाले आहेत. तर बार्सिलोनाचे एवढ्याच सामन्यातून 73 गुण झाले आहेत. मागील दोनवेळचा चॅम्पियन बार्सिलोना मागील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवू शकला नाही. त्यामुळे त्यांच्या व रियल माद्रिदमध्ये गुणांचे अंतर पडले. मेस्सीच्या मदतीने सुआरेजने 20 व तर ग्रीजॅनने 45 व्या मिनिटाला गोल केले. तत्पूर्वी व्हिल्लारियालच्या पाउ टोरेसने तिसर्यात मिनिटाला आत्मघातकी गोल केला होता. अन्सू फातीने बार्सिलोनाकडून 87व्या मिनिटाला चौथा गोल केला. गेरॉड मॉरेनोने व्हिल्लारियालकडून एकमेव गोलची नोंद केली.
अन्य सामन्यांमध्ये लेगानेसने एस्पिनयोलला 1-0 ने पराभूत केले. तर ओसासुना आणि गेटाफे यांचा सामना बरोबरीत संपला.