Marathi Biodata Maker

चेक बॉक्‍सिंग स्पर्धेत भारताला सुवर्ण

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2017 (11:19 IST)
भारतीय मुष्टियोद्धांनी चेक गणराज्यच्या 48व्या ग्रां प्री उस्ती नाद लाबेम चॅम्पियशीप स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदक जिंकले. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्यपदक विजेता शिव थापा (60 किलो), राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मनोज कुमार (69 किलो), अमित फंगल (52 किलो), गौरव बिधूरी (56 किलो) आणि सतीश कुमार (91 किलोहून अधिक) यांनी अंतिम फेरीत आपापल्या प्रतिस्पर्धींना पराभूत करत सुवर्णपदक पटकाविले.
 
कविंदर बिष्ट (52 किलो) आणि मनीष पंवार (81 किलो) यांना रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. तसेच सुमित सांगवान याचा उपान्त्य फेरीत पराभव झाल्याने त्याला कांस्य पदक मिळले.
 
अमित आणि कविंदर या दोघा भारतीय मुष्टियोद्धांमध्ये अंतिम सामना झाला. या दोघांमधील अमित हा लाईट फ्लाईवेटमध्ये (49 किलो) खेळतो. मात्र, या स्पर्धेत तो फ्लाईवेटमध्ये खेळला. त्याने कविंदरला 3-2 असे हरविले. त्यानंतर गौरवने पॉलंडच्या इवानो जारोस्लाववर 5-0 अशी सहज मात केली.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना या दिवशी खेळला जाईल

LIVE: महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार अनंतात विलीन

नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्यानंतर काय घडले?

सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी-बार्शी रस्त्यावर भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

अजित पवार यांच्या निधनावर भाजपने पूर्ण पानाची जाहिरात प्रसिद्ध केल्याने संजय राऊत संतापले

पुढील लेख
Show comments