Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Swiss Open Badminton: सात्विक-चिराग बनले चॅम्पियन, अंतिम फेरीत चिनी जोडीचा पराभव

Webdunia
रविवार, 26 मार्च 2023 (17:34 IST)
भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने स्विस ओपनमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत भारतीय जोडीने तांग कियान आणि रेन यू शियांग या चिनी जोडीचा पराभव केला. सात्विक आणि चिराग यांनी जेनी जोडीचा 21-19 आणि 24-22 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. स्विस ओपन सुपर सीरिज 300 बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत भारतीय जोडी सुरुवातीपासूनच उत्कृष्ट संपर्कात होती. सात्विक-चिराग यांनी पहिला गेम 21-19 अशा फरकाने जिंकला, परंतु दुसऱ्या गेममध्ये दोन जोड्यांमधली चुरशीची लढत पाहायला मिळाली. तथापि, भारतीय जोडीने अखेरीस 24-22 अशा फरकाने गेम जिंकून विजेतेपदही पटकावले.
 
तत्पूर्वी, भारतीय जोडीने 54 मिनिटे रंगलेल्या लढतीत जेप्पे बे आणि लासे मोल्हेडे या डॅनिश जोडीचा 15-21, 21-11, 21-14 असा पराभव केला होता. त्याचवेळी उपांत्यपूर्व फेरीतही सात्विक-चिराग यांनी 84 मिनिटे चुरशीचा सामना खेळला.भारतीय जोडीचे हे मोसमातील पहिले विजेतेपद ठरले. सात्विक आणि चिरागने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. 2019 मधील थायलंड ओपन आणि 2018 मधील हैदराबाद ओपन याशिवाय गतवर्षी इंडिया ओपन आणि फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या भारतीय जोडीचे हे करिअरमधील पाचवे वर्ल्ड टूर विजेतेपद होते.
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments