Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tokyo Olympics: एम्मा मॅककॅनने पोहण्याचे विक्रम केले, चार सुवर्णांसह सात पदके जिंकली

Webdunia
रविवार, 1 ऑगस्ट 2021 (14:13 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया 
ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एम्मा मॅककॅनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेत सात पदके जिंकून इतिहास रचला. एकाच स्पर्धेत चार सुवर्णांसह सात पदके जिंकणारी ती जगातील पहिली महिला जलतरणपटू आहे. 
 
ऑस्ट्रेलियन महिला जलतरणपटू एम्मा मॅककॉनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. तिने अनेक विक्रम नोंदवले. तिने टोकियो ऑलिम्पिक, खेळांची भव्य स्पर्धेत, पोहण्यात चार सुवर्णांसह एकूण सात पदके जिंकली आहेत. रविवारी (1 ऑगस्ट) तिने  4x100 मेडले रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमधील हे तिचे चवथे सुवर्णपदक होते. महिला म्हणून एकाच खेळात सात पदके जिंकणारी ती जगातील पहिली जलतरणपटू आहे.याशिवाय, ती ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी जगातील दुसरी महिला आहे. तिच्या आधी, 1952 मध्ये, रशियन जिम्नॅस्ट मारिया गोरोखोव्स्काया यांनी ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकली. या कामगिरीसह मॅकॉनने मारियाच्या विक्रमाची बरोबरी केली. 
 
ब्रिस्बेन येथील 27 वर्षीय महिला जलतरणपटू एम्मा मॅककेनच्या आधी तीन पुरुष जलतरणपटूंनी ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी केली होती. मायकेल फेल्प्स, मार्क स्पिट्झ आणि मॅट बियोन्डी यांचा समावेश आहे. या तीन जलतरणपटूंनी एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकली आहेत. 
 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments