Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Wimbledon: नोव्हाक जोकोविच कडून उपांत्य फेरीत यानिक सिनरचा पराभव

Webdunia
शुक्रवार, 14 जुलै 2023 (23:22 IST)
Novak Djokovic : सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन ओपनच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. जोकोविचने शुक्रवारी (14 जुलै) पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य फेरीत इटलीच्या यानिक सिनरचा पराभव केला. गतविजेत्या जोकोविचने नवव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्याने आठव्या मानांकित सिनरचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव केला. जोकोविचने हा सामना 6-3, 6-4, 7-6 (7-4) ने जिंकला.
 
सिंरचा पराभव करत जोकोव्हिच ने 35 व्यांदा जिंकून आपले स्थान मिळवले.त्याने संपूर्ण आक्रमक वृत्तीने सामन्यात प्रवेश केला. जोकोविचने दमदार टेनिसचे प्रदर्शन केले. त्याने अंपायरशी वाद घातला आणि प्रेक्षकांची टिंगलही केली. खरं तर, विम्बल्डनच्या मध्यवर्ती कोर्टात उपस्थित असलेले बहुतेक प्रेक्षक सिनरला पाठिंबा देण्यासाठी दिसले. जोकोविचने त्या प्रेक्षकांना आपल्या पद्धतीने चिडवले. तो आता विक्रमी आठव्यांदा विम्बल्डन जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे.
 
36 वर्षीय जोकोविच रविवारी सलग पाचव्यांदा विम्बल्डनच्या फायनलमध्ये उतरणार आहे. तेथे त्याचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कार्लोस अल्काराझ किंवा तिसऱ्या मानांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेव यांच्याशी होईल. रविवारी जोकोविच चॅम्पियन झाला तर तो रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन विजेतेपदांची बरोबरी करेल. जोकोविचला सलग पाचव्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी आहे. 
 
जोकोविचने आतापर्यंत 23 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा तो दुसरा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाची मार्गारेट कोर्ट या प्रकरणात पहिल्या स्थानावर आहे. मार्गारेटने २४ ग्रँडस्लॅम जिंकले. जोकोविचने या मोसमात ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन जिंकले आहे. यानिक सिन्नरकडे येताना, तो गेल्या वर्षी विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचला पराभूत करण्याच्या अगदी जवळ आला होता, परंतु सर्बियन अनुभवी खेळाडूने दोन सेटमध्ये बाजी मारून सिन्नरचा पराभव केला. यावेळी सिनरला फारशी छाप पाडता आली नाही. यादरम्यान त्याने काही चांगले शॉट्स मारले, पण जोकोविचने त्याला सहज हरवले.
 


Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

लंडनमधील अमेरिकन दूतावासाबाहेर मोठा स्फोट

LIVE: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी तीन मोठी नावे पुढे

महाराष्ट्र बिहारच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार? मुख्यमंत्रीपदावर शिंदे किंवा फडणवीस किंवा अजित पवार

Maharashtra Election Result : एकनाथ शिंदेंनी प्रिय बहिणींचे आभार मानले

पुढील लेख
Show comments