Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

World Athletics : नीरज चोप्रा इतिहास रचण्यासाठी सज्ज, मॅच कधी आणि कुठे पाहायला मिळेल जाणून घ्या

Webdunia
रविवार, 27 ऑगस्ट 2023 (10:27 IST)
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या मार्गावर आहे. त्याची रविवारी (27 ऑगस्ट) अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेत नीरजची नजर प्रथमच सुवर्णपदकावर असेल. ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीगमध्ये चॅम्पियन बनलेल्या या खेळाडूला केवळ जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. नीरज रविवारी त्याच्या बॅगेत सोने ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
 
नीरज ने शुक्रवारी एकाच थ्रो मध्ये  पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट तर मिळवलेच पण जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला. उशीरा व्हिसामुळे शेवटच्या क्षणी बुडापेस्टला पोहोचलेल्या किशोर जेना आणि डीपी मनू यांनीही नीरजच नाही तर भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

जागतिक अॅथलेटिक्समध्ये एकाच स्पर्धेत तीन भारतीयांनी एकत्र अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. नीरजने पहिल्या थ्रोमध्ये 88.77 मीटर भालाफेक केली. ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकअंतिम सामना 27 ऑगस्ट (रविवार) रोजी होणार आहे.
जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकहंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील नॅशनल अॅथलेटिक्स सेंटरमध्ये अंतिम सामना होणार आहे. भालाफेकअंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11.45 वाजता सुरू होईल.
 



Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments