Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अक्षय खन्ना : संवेदनशील कलाकार

मनोज पोलादे
जन्म- एप्रिल 4, 1975 मुंब ई.
पदार्प ण- हिमालयपुत्र

IFM
' दिल चाहता है' मधला सिद्धार्थ सिन्हा आठवतोय? आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या तारा जयस्वालवर (डिम्पल) मनातल्या मनात निस्वार्थ प्रेम करणारा. लाजाळू, गंभीर प्रवृत्तीचा, दुसर्‍यांच्या भावनांची कदर करणारा. कवी मनाचा सिद्धू. प्रत्यक्षातला अक्षय खन्ना यापेक्षा फार वेगळा नाही. अक्षय खन्ना चित्रपटात आला तेव्हा त्याच्याविषयी प्रसारमाध्यमात मोठी चर्चा होती.

कारण अभिनेता विनोद खन्ना यांच्या लोकप्रियतेचे वलय अक्षय खन्नाभोवती होते. विनोद खन्नाने पुत्राला ब्रेक देण्यासाठी हिमालयपुत्रची निर्मिती केली. पण चित्रपट साफ आपटला. अक्षयच्या डोक्यावर विरळ होत जाणारे केस पाहता हा नायक म्हणून किती वर्षे टिकेल असेही प्रश्न पहिल्याच चित्रपटानंतर विचारू जाऊ लागले. पण विचारणार्‍यांना त्याच्यातल्या अभिनेत्याची कल्पना नव्हती.

१९९७ मध्ये जे. पी. दत्त यांचा बॉर्डर आला आणि त्यातील अक्षयची भूमिका लक्षवेधी ठरली. विशेष म्हणजे सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी असे स्टार असूनही अक्षय लक्षात राहिला. पण त्यानंतर चुकीचे चित्रपट निवडल्याची चुक त्याला भोवली. त्यामुळे मोहब्बत, कुदरत, लावारीस अशी फ्लॉप चित्रपटांची रांग लागली. त्याच्याबरोबरीने आलेले बॉबी देओल सारख्या अभिनेत्यांना चांगल्या बॅनरचे चित्रपट मिळत असताना अक्षयकडे बड्या बॅनरचा एकही चित्रपट नव्हता. प्रियदर्शनच्या डोली सजाके रखनाकडून त्याला मोठी अपेक्षा होती. पण तोही फ्लॉप ठरला.

IFM
अक्षयबद्दल होणारी सकारात्मक चर्चा आता नकारात्मक होऊ लागली. त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या विरळ होत जाणार्‍या केसांवर उपहासात्मक चर्चा होऊ लागली. त्याची कारकिर्द वाचवायला शेवटी ऋषी कपूर यांचा आ अब लौट चले हा चित्रपट आला. नंतर सुभाष घई यांच्या तालने त्याला साथ दिली. आणि तो चर्चेत राहिला.

अक्षयच्या कारकिर्दीत महत्त्वाचा ठरला तो दिल चाहता है हा चित्रपट. फरहान अख्तरचा हा चित्रपट नव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारा होता. यात अक्षयने अतिशय वेगळी पण अतिशय छान अशी भूमिका केली. चाळीशीतल्या महिलेशी मनापासून प्रेम करणारा हा संवेदनशील चित्रकार लोकांनाही खूप आवडला. त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्याने 'हंगामा, हलचल' यामध्ये विनोदी, तर 'हमराज' मध्ये त्याने चक्क 'व्हीलन'. साकारला. भूमिकांच्या बाबतीत प्रयोग करायला तो कधीचं घाबरला नाही. कदाचित हीच त्याच्यातल्या कलाकाराची खरी ताकद असावी. त्याच्याकडून पुढील काळात आणखी चांगल्या भूमिकांची अपेक्षा आहे.

अक्षय अभिनित चित्रपट- सलाम ए इश्क, गांधी माय फादर, 36 चायना टाऊन, शादी से पहले, हलचल, दिवार, हंगामा, दिवानगी, हमराज,
दिल चाहता है, ताल, आ अब लौट चले, दहक, हिमालयपुत्र, एल ओ सी. कारगील, बॉर्डर

पुरस्कार :
फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता (बॉर्डर)
फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (दिल चाहता है)
सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, लीलावती रुग्णालयात दाखल

अक्षय कुमारने 'भूत बांगला'च्या सेटवर तब्बूचे केले स्वागत, 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही जोडी दिसणार एकत्र

हृतिक रोशनच्या 'कहो ना प्यार है' चित्रपटाला बॉलिवूडमध्ये झाले 25 वर्षे पूर्ण

कार्तिक आर्यनला 10 वर्षांनंतर अभियांत्रिकीची पदवी मिळाली

भूल भुलैया 2 नंतर तब्बू या हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरवणार

सर्व पहा

नवीन

सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडिओवर झाला

महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी एक प्राचीन देवगिरी किल्ला दौलताबाद

लवयापाचे रोमँटिक गाणे 'रेहना कोल' रिलीज

सैफ अली खान प्रकरणात पोलिसांनी एका नव्या संशयिताला ताब्यात घेतले, चौकशी सुरु

Show comments