Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आशुतोष गोवारीकर‍

कला व व्यावसायिकतेची सांगड घालणारा दिग्दर्शक

मनोज पोलादे
आगाम ी काळा त ज्याच्याकडू न खू प अपेक्ष ा ठेवायल ा हरक त नाह ी अश ा दिग्दर्शकांमध्य े आशुतोष गोवारीकर आह े. ऑस्करपर्यं त धड क मारलेल ा लगा न,
समीक्ष क व अभिजा त प्रेक्षकांच ी वाहव ा मिळवलेल ा स्वदे स ह े दो न ही ट चित्रप ट त्याच्य ा गाठील ा आहे त. त्याच्य ा चित्रपटा त कलात्म क व कमर्शिय ल सिनेमाच े सुरे ख कॉम्बिनेश न आढळत े.

प ण ह े ठिका ण गाठेपर्यं त त्याच्य ा आयुष्या त केव ळ संघर् ष व चाचपडण ं एवढं च होत ं. सुरवातील ा अभिनत ा म्हणून. 'सर्कस, सीआयडी' या मालिकांमधून त्याने काम केले. पण नियतीला बहुदा त्याचं दिग्दर्शक होणं पसंत असावे. दिग्दर्शक म्हणून त्याचा 'पहला नशा' हा चित्रपट आमीर खान नायक असूनही फ्लॉप ठरला.

यानंतर बाजीही चालला नाही. याच काळात त्याने आमीरला लगानची कथा एेकवली. अठराव्या शतकात ब्रिटिशांशी भारतीयांनी खेळलेला क्रिकेटचा सामना ही वन लाईन स्टोरी. वेगळ्या भूमिकांच्या शोधात असलेल्या आमीरला कथा खूप आवडली. एवढेच नव्हे तर चित्रपटाची निर्मिती स्वतः करण्याचे त्याने जाहीर केले.

त्यासाठी कंपनीही स्थापन केली. वास्तविक हा मोठा धोका होता. कारण कथा अठराव्या शतकातील होती. त्यातही चित्रपटभर क्रिकेट लोकांच्या किती पचनी पडेल याचा अंदाज नव्हता. शिवाय महिलावगर् चित्रपटापासून दूर राहण्याचा धोका होता. पण निर्मितीवर हात राखून खर्च न करता हा चित्रपट त्यांनी तयार केला.

त्यानंतर जे झालं तो इतिहास आहे. गदरसारखा भडक चित्रपट स्पर्धेत असूनही लगानला मोठे यश मिळाले. समीक्षकांनीही कौतुक केले. नंतर चित्रपटाने थेट आॅस्करची वारी केली. सलाम बॉम्बेनंतर आॅस्करपर्यंत पोहचणारा हा केवळ दुसरा चित्रपट.

भलेही त्याला आॅस्कर मिळाले नाही, पण यानिमित्ताने हिंदी चित्रपटांचा दर्जा उंचावला आहे, हे भान आले. यानंतर आशुतोष गोवारीकर हे अस्सल मराठी नाव हिंदी चित्रपटसृष्टीत अदबीने घेतले जाऊ लागले. लगाननंतर आलेल्या 'स्वदेस'ने निराश केले नाही.

अमेरिकेतून आलेल्या मूळ भारतीय तरूणाला दिसणारा भारत आणि त्याला या भारताची झालेली जाणीव असा विषय आशुतोषने अतिशय छान हाताळला. विषयाची संयत, नेमकी आणि वेधक हाताळणी हे त्याचे वैशिष्ट्य. शिवाय कलात्मक हाताळणी करताना कमर्शियल चौकटही त्याच्या ध्यानात असते.

त्यामुळे ते चित्रपट तिकिट खिडकीवरही यशस्वी ठरले आहेत. पॅकेज म्हणून चित्रपट देताना तो सर्व बाबींचे योग्य कॉम्बिनेशन देतो. त्यामुळे व्यावसायिक यशही मिळते. सध्या आशुतोष त्याच्या महत्त्वाकांक्षी अकबर जोधा या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.


आशुतोष गोवारीकरचे चित्रप ट-

जोधा अकबर (आगामी),
स्वदेश,
लगान,
बाजी,
पहला नशा.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील 'भसड़ मचा' या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा

कुंडली भाग्य' अभिनेत्री लग्नाच्या 5 वर्षांनंतर एका गोंडस मुलीची आई बनली

अभिनेता टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

Show comments