Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुनरागमनाचा निर्णय कठीण होता- माधुरी

Webdunia
IFMIFM
आपल्या मोहक हास्याने लाखो प्रेक्षकांना वेड लावणारी, लाखोंच्या ह्रदयाची धडकन माधुरी दीक्ष‍ित यशराज फिल्म्सच्य ा 'आजा नच ले' या चित्रपटातून पुनरागमन करीत आहे. हा चित्रपट 30 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. माधुरीचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पहात आहेत. माधुरीच्या मते तिच्या पुनरागमनासाठी यापेक्षा उत्कृष्ट चित्रपट असूच शकला नसता. तरीही या चित्रपटाचे भविष्य पूर्णपणे प्रेक्षकांच्या हातात आहे, हे ती मान्य करते. यानिमित्त तिच्याशी मारलेल्या या गप्पा:

पुनरागमनाचा निर्णय घेणे कठीण होते काय?
हो. बराच कालावधी गेल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते. कारण तुम्हाला तुमच्या पूर्वलौकीकाला जागून चांगलीच कामगिरी करावी लागते. तुमच्या प्रत्येक गोष्टींवर नजर ठेवली जाते. सगळ्यांना तुम्ही कोणता चित्रपट करत आहात व त्यात कोणती भूमिका करत आहात याची उत्सुकता असते. लोकांच्या खूप अपेक्षा असतात. त्याचा ताणही असतो. मी चुकीचे तर करत नाही ना? माझे काम आवडेल ना? असे अनेक प्रश्न मनात थैमान घालत असतात. माझ्यावर दोन मुलांची जबाबदारी आहे. ते मुंबईत राहू शकतील ना ? असा विचार माझ्या मनात होता. कारण इतके दिवस त्यांनी कधीच मुंबईत घालवले नाहीत. पण त्यांनी शूटींगचा मनसोक्त आनंद घेतला. माझा मोठा मुलगा आता हिंदी बोलतोही व हिंदी गाणेही गातो.

तुम्हाला हा चित्रपट कसा मिळाला?
फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्यात नृत्य केल्यानंतर यशजींनी मला चित्रपटात काम करण्यासंदर्भात विचारणा केली. मी यावर गांभीर्याने विचार केला नव्हता. नंतर आदित्य चोप्राने माझ्याशी चर्चा केली व चित्रपटाचा विषय मांडला. यशजींसोबत मी 'दिल तो पागल है' हा चित्रपट केला होता. त्यांचे काम सुनियोजीत व व्यवस्थित असते. त्याचप्रमाणे ते जे सांगतात ते खरे करून दाखवितात. त्यामुळे मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. त्या आदरापोटीच मी त्यांना होकार दिला.

' आजा नच ले'च्या कथेत काय वेगळेपण आहे?
पाश्चात्य संस्कृती आपल्या देशात पाय पसरवत आहे. परिणामी प्राचीन परंपरा असल्या आपल्या संस्कृतीपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपली कला, कौशल्ये नष्ट होत आहेत. चित्रपट माध्यम हेही त्यातलेच एक. हा चित्रपट आपल्या संस्कृतीशी नाळ जोडतो. आपली मुल्ये व संस्कृती याकडे घेऊन जातो. ही कथा आजच्या युगाशी मिळतीजुळती आहे. थोडक्यात 'फिल गुड मूव्ही' आहे.

तुमच्या भूमिकेविषयी सांगा.
यात मी दिया नावाची भूमिका करत आहे. दिया ठोस उद्दिष्ठ असलेली व स्वतंत्र विचारशैली असलेली महिला आहे. ती प्रेमात पडल्यानंतर स्वत:चे गाव सोडून न्यूयॉर्कला जाते. लग्नानंतर तिला कळते की तिने चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले. शेवटी ती आपल्या गावी परत येते. गावातील लोक तिच्यावर रागावलेले आहेत. तिच्याशी निगडीत एक महत्त्वाची बाब तिला वाचवायची आहे. दिया प्रश्न समोर पाहून रडत बसणार्‍यांमधील नाही. ती प्रश्न सोडविण्याचा ध्यास करणाऱ्यातली आहे. ती आशावादी आहे. तिचा चांगुलपणावर विश्वास आहे. प्रत्येक व्यक्ती आतून चांगली असते असे तिला वाटते.

दीर्घकाळानंतर कॅमेरासमोर आल्यानंतर काय वाटले?
फारच छान. पहिले दोन तास मी काही विसरले तर नाही ना? अशी भीती मनात होती. पण दोन तासांनी हेच विसरली की मी सहा वर्षांनी शूटींग करत आहे.

चित्रपट जगतात बदल झाल्याचे जाणवले काय?
हो, बरेच बदल पहायला मिळाले. आता वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनविले जात आहेत. सगळी कामे सुव्यस्थित होत आहेत. पटकथा आधीच दिली जाते. मला आठवते की आधी मी जेव्हा शूटींगला जायची तेव्हा बर्‍याचदा मला काय करायचे आहे हेच माहीत नसायचे. सेटवरच संवाद लिहिले जायचे. पण आता असे होत नाही. त्यामुळे कलाकारांना खूप मदत होते. ते तयारी करूनच सेटवर येतात. आता सिंक साउंडमध्ये शूटींग केले जाते. त्यामुळे डबिंगचे टेन्शन रहात नाही. आता 'भेजा फ्राय' व खोसला का घोसला' सारखे चित्रपट यशस्वी होतात. हे वेगळेपण या काळात घडले.

अनिल मेहतांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
मला पूर्वी असे वाटायचे की माझ्यापेक्षा धैर्यशील व्यक्ती या जगात नसेल. पण मेहतांना भेटल्यानंतर मला माझ्यासारखीच दुसरी व्यक्ती भेटली. परिस्थिती कशीही असो मेहता स्वत:वरचे नियंत्रण सुटू देत नाहीत. दिग्दर्शकाची गरज काय हे त्यांच्या मनात स्पष्ट झालेले असते. ते आपल्या कलाकारांना आपल्या हिशोबाने अभिनय करण्यास सांगतात.

' आजा नच ले' नंतरही चित्रपटात काम कराल?
मी याबाबत अजून विचार केलेला नाही.

कलेचा वारसा जपण्यासाठीचा संघर्ष : 'आजा नच ले'
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील 'भसड़ मचा' या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा

कुंडली भाग्य' अभिनेत्री लग्नाच्या 5 वर्षांनंतर एका गोंडस मुलीची आई बनली

अभिनेता टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

Show comments