Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिग-बीची यशस्वी सेकंड इनिंग (हॅपी बर्थ-डे)

Webdunia
WDWD
अमिताभ बच्चन यांना परमेश्वर मानणारे त्याचे चाहते आहेत. म्हणून त्यांच्या वाढदिवसादिवशी ते स्वतः ते जेवढ्या उत्साहात वाढदिवस साजरा करत नाहीत त्याहून अधिक उत्साहात त्यांचे चाहते वाढदिवस साजरा करतात. अगदी चौकाचौकात त्यांच्या प्रतिमा लावून आणि गोडधोड पदार्थाचे वाटप करून सेलिब्रेशन केले जाते.

कोणी मिठाई वाटते तर कोणी त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. त्यांचे चित्रपट पाहून हा दिवस साजरा करणारेही आहेत. आज 11ऑक्टोबर.. जगभरात देशभरात त्यांचा वाढदिवस तेवढ्याच उत्साहात साजरा केला जात आहे.

' सात हिंदुस्तानी' या चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात करणा-या अमिताभ यांना सुरुवातीच्या दिवसात अपयशाला सामोरे जावे लागले. पण, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. म्हणूनच अमिताभचे समवयस्क अभिनेते आज घरात असताना अमिताभ यांची सकंड इनिंग सुरू आहे. एवढेच नव्हे तर आजही ते महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. अमिताभ म्हटले की चित्रपट चालणारच, अशा विश्वास देणारे अमिताभ यांनी आज 66 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

अजूनतही त्यांच्या घरी निर्मात्यांची गर्दी असते. त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच भूमिका लिहिल्या जातात. बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवण्या-या प्रत्येक दिग्दर्शकाचे अमिताभ यांच्यासमवेत काम करण्याचे स्वप्न आहे.

पूर्वीच्या काळातील व्यावसायिक चित्रपटची कथा युवा भूमिकांवर लक्ष केंद्रित करूनच लिहिली जात होती. पण, अमिताभ यांच्या अभिनयातच इतकी ताकद होती की, जेव्हा अमिताभ यांचे वय उतरू लागले तेव्हा त्यांचे वय लक्षात घेऊन भूमिका लिहिण्यात येऊ लागल्या व चित्रपट निर्मिती सुरू झाली. कथेनुसार कलाकार नव्हे, कलाकारानुसार कथा, असा पायंडा सुरू झाला.

करियर आणि अभिनयानुसार अमिताभ यांचा सध्याचा उत्तम काळ आहे, असे काहींचे म्हणणे आहे. 'जंजीर' च्या नंतर ते 'टाइप्ड' झाले. ते सुपरस्टार बनले खरे पण, अभिनेता म्हणून त्यांचा पूर्ण उपयोग होत नव्हता. पण, त्यांनी उतरत्या वयात ही कमी भरून काढली. तरुण वयात नायक म्हणून ते गाजलेच पण, सध्या चतुरस्र भूमिकेतील त्यांचा अभिनय अधिक गाजला.


' सरकार राज', 'चीनी कम', 'द लास्ट लियर', 'नि:शब्द', 'ब्लैक' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये बिग-बीने विविध भूमिका कुशलतापूर्वक केल्या. अभिनय आणि स्टार वॅल्यूमध्ये युवा अभिषेकपेक्षा वयस्क अमिताभ अनेक मैलांनी पुढे आहे.

एवढी दूरगामी प्रसिद्धी आणि लोकप्रियता बॉलीवूडमध्ये सर्वांच्या नशिबात नाही. आपणच सुपरस्टार असल्याचा दावा अनेकजण करीत आहेत. मात्र, अमिताभ लोकप्रियतेच्या ज्या टोकावर आहेत त्याच्या आसपासही कोणी नाही, ही वस्तुस्थिती आहे.

बिग-बी, तुम्ही यापुढेही आपल्या अभिनयाने देशातील करोड़ो लोकांचे मनोरंजन करावेत यासाठी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

Show comments