Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉलीवूडचा 'आईवेडा' बादशाह

Webdunia
IFMIFM
'' मला चित्रपट पाहण्याची आवड आईमुळे लागली. आईला च‍ित्रपट पहायला खूप आवडायचे. 70 च्या दशकातील जवळपास सर्वच चित्रपट मी पाहिले होते. हे चित्रपट केवळ माझ्या आईमुळेच मी पाहिले. आज या चित्रपटांच्या जगताचा मी सम्राट आहे. पण सर्वस्व देऊनही मी माझ्या आई-वडिलांना परत मिळवू शकत नाही,''

सीएनएन-आयबीएनला दिलेल्या मुलाखतीत शाहरूख खान सांगत होता. तो म्हणाला,

मी चित्रपटगृहात पहिला चित्रपट पाहिला तो देव साहेबांचा जोशीला. त्यात एक गाणे होते, ' किसका रस्ता देखे ऐ दिल ऐ सौदाई' हा चित्रपटही मी माझ्या आईमुळेच पाहिला. मी हिंदीत 10 पैकी 10 गुण मिळविले तर चित्रपट पहायला घेऊन जाईल असे आश्वासन त्यावेळी आईने दिले होते. तसे गुण मिळाले आणि हा चित्रपट बघायला मिळाला. याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. आज लोक विचारतात, की या चित्रपटाने तुमच्या जीवनाची दिशा बदलली का याला माझे होकारार्थी उत्तर असते. कारण यामुळेच मला वाटले की मी काही करू शकतो. अर्थात चित्रपटांबद्दल माझे आकर्षण एवढे असले तरी या क्षेत्रात मी जाईन असे मला कधीही वाटले नव्हते. किंबहूना तसा विचारही मी कधी केला नव्हता.

1980 च्या सुरूवातीस व्हिसीआर आले. त्यावेळी चित्रपटांविषयी माझे आकर्षण वेड लागण्यापर्यंत पोहोचले होते. मग आम्हीसुद्धा आमच्या घरी पहिल्यांदाच व्हिसीआर आणला. त्यावेळी माझ्या बहिणीही आमच्या घरीच होत्या. आम्हाला इतका आनंद झाला की सर्वांनी मिळून जाम धमाल केली. एकत्रितपणे बरेच चित्रपट पाहिले.

IFMIFM
पूर्वीच्या नायकांची मानसपूज ा
सत्तरच्या दशकात शाहरूख असता तर काय झाले असते? या प्रश्नावर तो म्हणाला, त्यांनी डॉन चित्रपटातील भूमिका नक्की केली असती. पण त्या काळात अभिनेते जसे ओरडायचे ते मात्र जमले नसते. अर्थात असे असले तरी या काळातील अभिनेते लोकांच्या ह्रदयावर राज्य करत होते. त्यांच्याविषयी लोकांच्या मनात आजही आपुलकी आहे. प्रणय आजच्या चित्रपटांतही असला तरी त्या काळातील त्याची खुमारी काही औरच होती. म्हणूनच राजेश खन्ना ज्या काळात सुपरस्टार होता त्या काळात मी असतो तर नक्कीच आजच्या सारखा सुपरस्टार बनू शकलो नसतो.

शाहरूखचे चिनी चाहत े
शाहरूखची ओम शांती ओममधील पीळदार शरीरयष्टी चीनमधील त्यांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. चित्रपट अजून झळकला नसतानाही त्याच्या लुकने प्रेक्षकांना वेड लावले आहे. चीनमधील हारबिन शहरात अनेकांकडे शाहरूखची पोस्टर्स आहेत.
अनेकाच्या मोबाईलची रिंगटोन छैया छैया हे दिलसे चित्रपटातील गीत आहे.

किंग खान- थोडंसं 'पर्सनल'
* शाहरूख इलेक्ट्रानिक्स व बायालॉजीमध्ये हुशार असला तरी गणितात मात्र कच्चा होता.
* काही वर्ष त्यांने नवी दिल्लीत दरियागंज भागात हॉटेल चालविले.
* त्याला कॉफी कॅपेचिनो व स्टारबक्सची डीकॅफे आवडते. कॉफीसोबत जास्त साखर आवडत नाही.
* गौरीचे चित्त चोरण्यासाठी त्यांने 'चितचोर' चित्रपटातील 'गोरी तेरा गाव बडा प्यारा' हे गाणं गायलं होतं.
* अभिनेता नसतो तर आपण शिक्षक असतो, असं त्याचं मत आहे.
* आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण गौरीसोबतचे लग्न हा होता.
* फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तो आनंदाचा दुसरा क्षण.
* पडद्यावरचा कठोर किंग खान आईवडिलांच्या बाबतीत हळवा आहे. आज सर्वस्व देऊनही त्यांना मिळवू शकत नाही, ही त्याची खंत आहे.
* 'कभी हा कभी ना' या चित्रपटातील भूमिका सर्वांत आवडती आह े.

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील 'भसड़ मचा' या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा

कुंडली भाग्य' अभिनेत्री लग्नाच्या 5 वर्षांनंतर एका गोंडस मुलीची आई बनली

अभिनेता टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

Show comments