Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉलीवूडच्या नायिकांना विवाहित पुरूषच का आवडतात?

वेबदुनिया
सोमवार, 9 नोव्हेंबर 2009 (12:07 IST)
IFM
IFM
बॉलीवूडच्या नायिकांना विवाहित पुरूष का आवडत असावेत? लग्नासाठी त्यांना बॅचलर मंडळी दिसत नाहीत काय? बहुतांश नायिकांच्या बाबतीत याचे उत्तर नाहीच असे म्हणता येईल. हेमा मालिनी, श्रीदेवी, रवीना टंडन या नायिकांनंतर आता शिल्पा शेट्टीही बीजवराच्या गळ्यातच वरमाला घालणार आहे.

राज कुंद्रा या उद्योगपतीशी शिल्पा शेट्टीचे अफेअर बर्‍याच दिवसांपासून रंगले आहे. ब्रिटनस्थित कुंद्राचे अनेक उद्योग आहेत. त्याला कविता नावाची बायकोही आहे. पण शिल्पा त्यांच्या नात्यात आली आणि कविता दूर गेली. कुंद्राने रितसर तिला घटस्फोटही दिला. कविताच्या मते तर शिल्पानेच आमचा संसार मोडला. अर्थात, शिल्पा याला नकार देते. राजला पाहिल्यानंतरच मी त्याच्या प्रेमात पडले होते. पण तो विवाहित आहे हे माहित असल्याने आपल्यात फक्त मैत्री राहिल असेही मी त्याला स्पष्ट केले होते. नंतर आम्हाला नाते संबंधांची गरज वाटल्यानंतर पहिल्या बायकोला घटस्फोट दिल्याशिवाय लग्न करणार नाही, असेही मी त्याला स्पष्ट केले. त्याने तसे केल्यानंतरच मी त्याच्याशी लग्नाचा निर्णय घेतल्याचे शिल्पा म्हणते.

पण लग्न मोडणारी शिल्पा हीच एकटी बॉलीवूडची नायिका नाही. धर्मेंद्रने प्रकाश कौरशी लग्न करून सनी, बॉबी यांच्यासह दोन मुलींना जन्म दिला होता. पण त्यानंतर ड्रिमगर्ल हेमामालिनीच्या प्रेमात तो पडला. त्यासाठी त्याने इस्लाम धर्मही स्वीकारला. हेमामालिनीशी लग्न केल्यानंतर त्याला इशा आणि आहना या दोन मुलीही झाल्या.

बॉलीवूडची प्रसिद्ध कॅब्रे डान्सर हेलन यांनी पटकथा लेखक सलीम खान यांच्याशी लग्न केले. सलीम यांचे आधीच सलमा खान ( पूर्वाश्रमीच्या सुशीला चरक- या महाराष्ट्रीय आहेत.) यांच्याशी लग्न झाले होते. या दाम्पत्याला सलमान, सोहेल, अरबाज आणि अलविरा ही मुले आहेत. हेलन यांच्याशी लग्न केल्यानंतर या नवदाम्पत्याने अर्पिता या मुलीला दत्तक घेतले.

श्रीदेवीनेही निर्माता बोनी कपूरबरोबर असेच लग्न केले. बोनीचे लग्न आधीच झाले होते. समीक्षकांची लाडकी अभिनेत्री शबाना आझमीनेही विवाहित जावेद अख्तर यांच्याच गळ्यात माळ घातली. जावेदचे लग्न आधी पटकथा लेखक हनी इराणी यांच्याशी झाले होते. त्यांच्यापासून त्यांना फरहान आणि झोया ही दोन मुलेही झाली होती.

रवीना टंडननेही चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केले. अनिलची आधीची बायको नताशा सिप्पी होती.

शिल्पा शेट्टीनंतरही तिची परंपरा चालविणार्‍या नायिका बॉलीवूडमध्ये दिसताहेत. करीना कपूरचे विवाहित सैफ अली खानशी अफेअर आहे. सैफचे अमृता सिंगशी आधीच लग्न झाले आहे. आता त्याने करीनाशी लग्न करण्यासाठी तिच्याशी घटस्फोटही घेतला आहे. तबूही सध्या नागार्जुन या दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत एंगेज आहे. नागार्जुनशी आमला या नायिकेशी आधीच लग्न झाले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट मैने प्यार किया' ला 35 वर्षे पूर्ण, चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार

मल्याळम अभिनेता दिलीप शंकर हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सलमान खानने शेअर केले 'सिकंदर'चे पहिले पोस्टर

सर्व पहा

नवीन

New Year 2025 : या अद्भुत ठिकाणी नवीन वर्ष करा सेलिब्रेट

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

Suresh Dhas Apologies Prajakta Mali अखेर सुरेश धसांनी मागितली प्राजक्ता माळींची माफी

New Year 2025 : नवीन वर्षात उदयपूर जवळील या ठिकाणांना द्या भेट

Long Weekends 2025 नवीन वर्षात कधी फिरायचा जायचे, सुट्टया बघून निश्चित करुन घ्या

Show comments