Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राम गोपाल वर्मा

प्रयोगशील दिग्दर्शक

अभिनय कुलकर्णी
राम गोपाल वर्माचे चित्रपट काहीसे वेगळे असतात. आयुष्याची गडद बाजू बहुधा त्याला जास्त भावते. त्यामुळे अशा चित्रपटांची संख्या त्याच्या कारकिर्दीत जास्त आहे. सत्या, कंपनी, सरकार ही त्याची काही उदाहरणे. मूळचा दक्षिणेतला असले्ल्या रामगोपाल ऊर्फ रामूला लहानपणापासूनच चित्रपटाचे वेड. तो हिंदीप्रमाणे अमेरिकन चित्रपटही फार बघायचा. चित्रपटात दिग्दर्शकाच्या ठिकाणी आपले नाव यावे असे त्याला फार वाटायचे. चित्रपटाविषयी त्याच्या कल्पना फार लहानपणीच स्पष्ट झाल्या होत्या.

IFM
चित्रपटाचे त्याचे वेड पाहून घरचेही संतापत. मार देत. पण त्याचे हे वेड सुटले नाही. उलट वाढत गेले. काही काळ त्याने व्हीडीओ कॅसेटसची लायब्ररीसुध्दा चालवली. त्यानंतर त्याने हैदराबाद येथील फिल्मसिटीत प्रवेश मिळविला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम करायला सुरवात केली. याच काळात त्याने शिवा हा चित्रपट बनविला. कथा, पटकथा व दिग्दर्शन त्याचेच होते. यावेळी त्याचे वय होते 28.
कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय बनविलेल्या या चित्रपटात महाविद्यालयीन गुंडागिरीचा विषय होता. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. रामू रात्रीत प्रसिध्दीच्या झोतात आला. त्यानंतर त्याने काही तमिळ चित्रपट काढले.

पुढची पायरी म्हणजे त्याने स्वत:ची निर्मिती संस्था स्थापन केली. दक्षिणेत यश मिळविल्यानंतर रामूने बॉलिवूडकडे मोर्चा वळविला. 'रंगीला' हा त्याचा पहिला यशस्वी व्यावसायिक चित्रपट. उर्मिला मातोंडकरला नायिका म्हणून प्रस्थापित करणारा हा चित्रपट खूप गाजला. यानंतर त्याचा सत्या आला. मुंबईतील गुन्हेगारी विश्व त्याने पहि्ल्यांदाच तपशीलवार दाखवून दिले. गुंडांचे परस्पर व्यवहार, त्यांचे आयुष्य हेही त्याने दाखविले. हा चित्रपटही खूप गाजला. विशेष म्हणजे यात कुणीही मोठा कलाकार नव्हता.

यानंतर रामूच्या चित्रपटांची फॅक्टरी सुरू झाली. सत्यानंतर उच्च वतुर्ळातील गुन्हेगारी विश्वाचे दर्शन घडविणारा कंपनी हा चित्रपट आणला. पण त्याला मर्यादीत यश मिळाले. त्यानंतर मग त्याच्या चित्रपटांची रांगच लागली. दौड, प्यार तूने क्या किया, मस्त, रोड, जंगल, नाच. यातील दौड, रोड फारसे चालले नाहीत. त्याने अमिताभ बच्चन यांना घेऊन सरकार काढला. हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला. त्यात अमिताभचे पात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेतल्याने त्याला प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीही बरीच मिळाली.
साठीतला पुरूष व अगदी तरूण स्त्री यांच्यातील प्रेमावर आधारीत निशब्द हा त्याचा चित्रपट नुकताच आला. अमिताभ बच्चन यांची भूमिका असूनही चित्रपट अयशस्वी ठरला. सध्या तो रामगोपाल वर्मा के शोलेच्या तयारीत व्यस्त आहे.

रामूला भय या भावनेविषयी खूप आस्था असल्याचे जाणवते. त्यामुळे त्याने याविषयावर बरेच चित्रपट काढले. सुरवातीला त्याचा रात हा चित्रपट असाच. नंतर त्याने कौन, भूत, डरना मना है, डरना जरूरू है हे चित्रपटही दिले. यातील कौन चांगला असूनही अयशस्वी ठऱला. भूतला बरे यश मिळाले. वास्तूशास्त्र पडला. डरनाचे दोन्ही भाग बऱ्यापैकी चालले.

रामूच्या चित्रपटांचे वैशिष्टय म्हणजे ते खूप कमी बजेटचे असतात. नवख्या कलाकारांना घेऊन तो यशस्वी चित्रपट बनवितो. नायिकांना ग्लॅमरस पद्द्धतीने सादर करणे ही त्याची हातोटी आहे. (पहा. रंगीला, नाच) गुन्हेगारी व भय या विषयाबद्दल त्याला अधिक आस्था असल्याने अशा चित्रपटांवर तो जीव ओतून काम करतो. त्याने त्याच्या कंपनीच्या माध्यमातून अनेक नव्या दिग्दर्शकांना संधी दिली आहे. या सर्व चित्रपटांवरील रामूचा ठसा चटकन लक्षात येतो. त्याच्या चित्रपटातील रंग, कॅमेऱ्याची हाताळणी हे सारे काही इतरांच्या तुलनेत वेगळे असतात. त्यामुळे रामूचा सिनेमा ओळखू येतो.

रामगोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट- राम गोपाल वर्मा के शोले (आगामी), निःशब्द शिवा, डरना जरूरी है, नाच भूत, कंपनी जंगल, मस्त प्रेम कथा, कौन?, सत्या, दौड, रंगीला, रात, सरकार.
सर्व पहा

नक्की वाचा

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सर्व पहा

नवीन

जगभरात प्रसिद्ध आहे भारतातील ही टॉप 5 पर्यटन स्थळे

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

New Year 2025 : या अद्भुत ठिकाणी नवीन वर्ष करा सेलिब्रेट

Show comments