rashifal-2026

श्री स्वामी समर्थ स्तवन

Webdunia
सोमवार, 6 मे 2024 (16:25 IST)
नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता | प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ ||
 
नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार | नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ ||
 
नरदेही नरसिंह | प्रगटला तरुपोटी | नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्यागती || ३ ||
 
कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी | यमा वाटे ज्याची भीती | योगीश्वर हाच यती || ४ ||
 
कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली | कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमातटी || ५ ||
 
कालीमाता बोले संगे | बोले कन्याकुमारीही | अन्नपूर्णा ज्याचे हाती | दत्तगुरु एकमुखी || ६ ||
 
भारताच्या कानोकानी | गेला स्वये चिंतामणी | सुखी व्हावे सारे जन | तेथे धावे जनार्दन || ७ ||
 
प्रज्ञापुरी स्थिर झाला | माध्यान्हीच्या रविप्रत | रामानुज करी भावे | स्वामी पदा दंडवत || ८ ||
 
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा

आरती सोमवारची

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Thai Amavasai 2026 थाई अमावसाई म्हणजे काय आणि या दिवशी काय शुभ मानले जाते?

रविवारी करा आरती सूर्याची

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments