Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वाइन फ्लूवरील लस डिसेंबरपर्यंत बाजारात

Webdunia
कॅडिला फार्मास्युटिकल्स (सीपीएल) इनफ्लूएंझा एच १ एन १ अर्थात स्वाइन फ्लूवर लस बाजारात आणण्याच्या तयारीत असून त्याची वैद्यकिय चाचणी करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागण्यात आली आहे. ही लस डिसेंबरपर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा आहे.

स्वाइन फ्लूसह अनेक आजारांवर लस विकसित करण्यासाठी सीपीएल व सीपीएल बायॉलॉजिकल या कंपनीने अमेरिकास्थित नोवावॅक्सबरोबर करार केला आहे. या करारांतर्गत आता या लशीची चाचणी घेण्यासाठी औषध नियामक महासंचलनालयाकडे (डिसीजीआय) अर्ज करण्यात येणआर आहे, असे सीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आय. ए. मोदी यांनी सांगितले.

डिसीजीआयकडून आम्हाला परवानगी मिळाल्यास आमच्या सहकारी कंपनीकडून उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डिसेंबरपर्यंत ही लस बाजारात येईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. स्वाइन फ्लूवर लस आणणारी कॅडिला ही पहिलीच कंपनी ठरणार आहे. स्वाइन फ्लूवरच्या या नव्या लशीचा डोस दोन आठवडे द्यावा लागेल.

सिप्ला उपलब्ध साधनक्षमतेच्या बळावर महिन्याला दहा लाख डोस तयार करू शकेल. सिप्लाची सहयोगी अमेरिकन कंपनी नोवावॅक्सला साइन फ्लूच्या लशीची वैद्यकिय चाचणी घेण्याची परवानगी अमेरिकेच्या फेडरल ड्रग एडमिनिस्ट्रेशनकडून मिळाली आहे. आम्हालाही ती लवकरच मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

स्वाइन फ्लूसंदर्भात कोणताही अर्ज तातडीने निकालात काढण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याअंतर्गत आम्हाला परवानगी मिळेल, असे मोदी यांनी नमूद केले.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

गाजराचे लोणचे बनवण्याची सोप्पी पद्धत

एमबीए इन मटेरियल मैनेजमेंट मध्ये करिअर करा

तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट प्रभावी आहे का

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स

Sunday Special Recipe : फ्राइड चिकन पॉपकॉर्न

Show comments