Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हार्दिक पांड्याचा मोठा पराक्रम, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

Webdunia
बुधवार, 26 जून 2024 (18:54 IST)
ICC ने T20 World Cup दरम्यान नवीन क्रमवारी जाहीर केली आहे.सध्या कोणतेही सामने कसोटी किंवा एकदिवसीय खेळवले जात नसून टी-20 सुरु आहे. अशा परिस्थतीतीत बदल टी -20  क्रमवारीत होत असून या क्रमवारीत टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने चांगली कामगिरी केली आहे.

त्याने मोठी झेप घेतली आहे त्याने सरळ चार स्थानांनी झेप घेतली आहे. सध्या हार्दिक पांड्याचे रेटिंग 213 असून तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हार्दिक पांड्याने आपल्या T20 विश्वचषक सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने विरोधी संघाला पराभूत करण्याचे काम केले आहे.
 
सध्या टी-20 मध्ये अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आहे. श्रीलंकेचा संघ 2024 च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडला असला तरी यानंतरही वानिंदू हसरंगाने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच तो आता एका स्थानाची झेप घेत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. 
 
अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीनेही या वेळी रँकिंगमध्ये वाढ केली आहे. त्याने आता 214 रेटिंगसह दोन स्थानांनी झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या मार्कस स्टॉइनिसबद्दल बोललो तर त्याला तीन स्थानांनी घसरण झाली आहे. 211 च्या रेटिंगसह तो आता थेट चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रझा अजूनही 210 च्या रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आहे. बांगलादेशकडून सध्या टी-20 विश्वचषक खेळत असलेला माजी कर्णधार शकीब अल हसन6 व्या क्रमांकावर आला आहे. 

नेपाळच्या दीपेंद्र सिंगचीही एका स्थानावर घसरण झाली आहे. तो 7व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामबद्दल बोलायचे झाले तर त्याला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता 187 च्या रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आला आहे. इंग्लंडचा मोईन अली 181 रेटिंगसह नवव्या आणि लियाम लिव्हिंगस्टन 181 रेटिंगसह नवव्या स्थानावर आहे. 

Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

या भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती, 31व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

IND W vs WI W:पहिल्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव

मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केला

MUM vs MP: मुंबईचे देशांतर्गत क्रिकेटवर वर्चस्व,जिंकले सय्यद मुश्ताक ट्रॉफीचे विजेतेपद

हेड आणि स्मिथच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 400 ओलांडली, बुमराहने 5 विकेट घेतल्या

पुढील लेख
Show comments