Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयसीसी कडून महिलाT20 विश्वचषक 2024 साठी बक्षीस रक्कम जाहीर

Webdunia
मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (16:38 IST)
महिलाT20 विश्वचषक 2024 यंदा युएईच्या भूमीवर आयोजित केले जाणार आहे.यापूर्वी ते बांगलादेशमध्ये आयोजित केले जाणार होते. मात्र तेथील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आयसीसीने ते यूएईमध्ये करण्याचा निर्णय घेतला. यावेळी T20 विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होतील, ज्याचे वेळापत्रक आयसीसीने आधीच जाहीर केले आहे. 
 
ICC ने महिला T20 विश्वचषक 2024 साठी अंदाजे $7,958,000 (रु. 66,64,72,090 कोटी) वाटप करण्याची घोषणा केली आहे, जी मागील हंगामाच्या दुप्पट रकमेपेक्षा जास्त आहे. विजेत्या बक्षीस रकमेत 134% ने वाढ करण्यात आली आहे आणि विजेत्या संघाला आता $2,340,000 (अंदाजे रु. 19,59,88,806 कोटी) मिळतील. तर उपविजेत्या संघाला $1170000 (अंदाजे रु. 9,79,78,432 कोटी) मिळतील. 
 
ICC च्या विधानानुसार, महिला T20 विश्वचषक 2024 ही पहिली ICC स्पर्धा असेल ज्यामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने बक्षीस रक्कम मिळेल, जी खेळाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी असेल.
ज्यात विश्वचषक पुरुष आणि महिलांसाठी समान बक्षीस रक्कम आहे. 

महिला  T20 विश्वचषक 2024 युएईमध्ये 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताला अ गटात ठेवण्यात आले आहे. या गटात भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे.
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

IND vs BAN सिरीज पूर्वी गंभीर ने घेतली या खेळाडूची मदत

Duleep Trophy: प्रथमसिंग आणि टिळक वर्मा यांनी शतके झळकावली

IPL 2025:धोनीबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघ घेऊ शकतो मोठा निर्णय!

दुलीप ट्रॉफीमध्ये इशान किशन ने शतक झळकावले

युझवेंद्र चहलने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खास 'शतक' पूर्ण करून मोठा पराक्रम केला

पुढील लेख
Show comments