Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुरू नानकदेव

Webdunia
जन्म- १५ एप्रिल १४६९
महानिर्वाण- ७ सप्टेंबर, १५३९

गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे १५ एप्रिल १४६९ रोजी एका हिंदू कुटुंबात झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.

गुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक होते. लहानपणी मौंजीबंधनावेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या.

सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिल ी गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते.

गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी 'कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत', असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती.

त्यासाठी अनेक केंद्राची साखळी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्वज्ञान मांडले. ते क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला.
सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Saphala Ekadashi Mantra 2024: सफला एकादशीचा उपवास करत असाल तर या मंत्रांचा अवश्य जप करा

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

Christmas Day : ख्रिसमस 25 डिसेंबरलाच का साजरा करतात, इतिहास जाणून घ्या

Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

Show comments