Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशी होते अमेरिकन राष्‍ट्राध्‍यक्षाची निवड

वेबदुनिया
अमेरिकेत राष्ट्राध्‍यक्ष पदासाठी होत असलेल्‍या निवडणुकीची प्रक्रिया भारतीय निवडणूक पध्‍दतीच्‍या तुलनेने खूपच क्‍लीष्‍ट व लांबलचक असते.

दर चार वर्षांमध्‍ये जानेवारी महिन्‍यात अमेरिकेत निवडणुका सुरू होतात. पहिल्‍या टप्‍प्‍यात ‘प्रायमरी’ पासून सुरु होते. या निवडणुकीच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यात पक्षांतर्फे आपल्‍या उमेदवारांची नावे जाहीर केली जातात.

त्‍यानंतर, दूस-या टप्‍प्‍यात प्रत्‍येक राज्यातील मतदार अशा प्रतिनिधींची (डेलिगेट) निवड करतात, जे दूस-या टप्‍प्‍यात पक्षाच्‍या संमेलनात (कन्वेन्‍शन) सहभागी होऊ शकतात. कन्वेन्‍शनमध्‍ये हे प्रतिनिधी राष्ट्राध्‍यक्षपदाच्‍या उमेदवाराची निवड करतात. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडतो.

तिस-या टप्‍प्‍यात प्रत्‍यक्ष निवडणूक प्रचारास सुरुवात होते. त्‍यात वेगवेगळया पक्षाचे उमेदवार मतदारांचे समर्थन मिळविण्‍याचा प्रयत्‍न करतात. याच दरम्‍यान, उमेदवारांमध्‍ये दूरचित्रवाणीवरून या प्रकारावरून चर्चाही रंगतात.

शेवटच्‍या टप्‍प्‍यात उमेदवार आपली पूर्ण ताकत ‘स्विंग स्टे्टस’ला आपल्‍याकडे वळविण्‍यासाठी खर्ची करतात. ‘स्विंग स्टे्टस’ ही अशी राज्ये असतात जिथले मतदार कोणत्‍याही बाजूला वळण्‍याची शक्‍यता असते. नोव्‍हेंबर महिन्‍यात मतदार एका अशा इलेक्टरची निवड करतात जो कोणत्‍या तरी एका उमेदवाराचा समर्थक असतो. त्‍यास ‘इलेक्टोरले कॉलेज’ असे संबोधित केले जाते. यात 538 सदस्य असतात.

राष्ट्रपती बनण्‍यासाठी किमान 270 इलेक्टोरलची मते गरजेची असतात. राज्यांमध्‍ये मते जिंकणारा उमेदवारच इलेक्टोरल मते मिळविण्‍यात शक्‍यतोवर यशस्‍वी होतो. जेव्‍हा एखादा उमेदवार इलेक्‍टोरल मते मिळवून घेतो. त्‍यावेळी सर्वसामान्‍य जनतेच्‍या दृष्‍टीने निवडणुका संपतात.

‘इलेक्टोरले कॉलेज’च्‍या सदस्यांनी आपसात केलेल्‍या मतदानातूनच निर्णय समोर येतो. या सर्व प्रक्रियेबद्दल एका राजकारण्‍याचे मत आहे, की जितक्‍या वेळेत भारतात एक अल्‍पमत सरकार बनतं, काम करतं आणि कोसळत तेवढा वेळ अमेरिकेत राष्‍ट्राध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीसाठी लागतो.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

मधुमेह आणि पोटाची चरबी नियंत्रित करण्यासाठी करा कुर्मासन योग, पद्धत जाणून घ्या

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

चायनीज चिकन रेसिपी

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Show comments