अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांनी शपथ घेतल्यानंतर न्यूयॉर्कमधील एका चर्चमध्ये साडेतीन तास घंटा वाजविण्यात येईल. ब्रिटन व इतर युरोपीय देशांमध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी अशी घंटा वाजविण्यात येते. त्याची पुनरावृत्ती अमेरिकेतही होत आहे.
श्री. ओबामा वीस जानेवारीला (मंगळवारी) अध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यानंतर न्यूयॉर्कच्या ग्राऊंड झीरो येथील चर्चमध्ये बारा मोठ्या घंटांचा नाद करण्यात येईल. साडेतीन तास हा घंटानाद होईल. या चर्चमध्ये चेंजिंग रिंगिंग बेल्स बसविण्यात आल्या आहेत. बारा लोक या बारा घंटा वाजवतील.